११७७९ रुपयांचा शेअर ५०२८ रुपयांवर आला, गुंतवणूकदारांना करतोय कंगाल; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 21:46 IST2025-04-14T21:41:51+5:302025-04-14T21:46:30+5:30

गेल्या चार वर्षांत जबरदस्त परताना देणारा हा शेअर, चालू वर्षात आतापर्यंत तशी कामगिरी करण्यात अयशस्वी राहिला आहे...

सध्या शेअर बाजारातील अपार इंडस्ट्रीजचा शेअर (Apar Industries Limited) अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. हा शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरताना दिसत आहे.

गेल्या चार वर्षांत जबरदस्त परताना देणारा हा शेअर, चालू वर्षात आतापर्यंत तशी कामगिरी करण्यात अयशस्वी राहिला आहे. या शेअरमध्ये एप्रिल महिन्यात 9.23% चा घसरण झाली. वार्षिक आधारावर या शेअरची घसरण 51.26% झाली.

11,779 वरून 5,028 रुपयांवर आला - जानेवारीच्या सुरुवातीला या शेअर्सने ११,७७९ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आता तो उच्चांकापासून ५७.३१% खाली आला आहे. सध्या हा स्टॉक ५,०२८ रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण म्हणजे, डिसेंबर तिमाहीतील खराब निकाल.

वर्ष २१ आणि वर्ष २४ दरम्यान, शेअरची किंमत प्रति शेअर ₹३४९ वरून ₹१०,३१७ पर्यंत वाढली. या कालावधीत या शेअरमध्ये २,८५६% ची वाढ झाली.

मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही, गेल्या तीन वर्षांत हा शेअर अद्यापही ६३७% आणि गेल्या पाच वर्षांत १,५६८% वर आहे.

अपार इंडस्ट्रीज हा एक स्मॉल-कॅप स्टॉक आहे. कंपनीचे मार्केट कॅप ₹२०,१९८ कोटी एवढे आहे. ही इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंगच्या विविध क्षेत्रात काम करणारी एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. जी पॉवर ट्रान्समिशन कंडक्टर, पेट्रोलियम स्पेशॅलिटी ऑइल आणि पॉवर, तसेच टेलिकॉम केबल्समध्ये मूल्यवर्धित उत्पादने आणि सेवा प्रदान करते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)