बम्पर परतावा! शेअर बाजारात या ₹4 च्या स्टॉकचा नुसता 'भांगडा', 1 लाखाचे केले थेट 11 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:28 PM2023-08-18T12:28:05+5:302023-08-18T12:51:54+5:30

गेल्या केवळ सहा महिन्यांतसुद्धा या शेअरने 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

शेअर बाजारात अपार इंडस्‍ट्रीजचा शेअर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. गुरवारच्या व्यापारी सत्रात हा स्‍टॉक 410 रुपयांच्या जबरदस्त तेजीसह 4703.60 रुपयांवर पोहोचला. शेअरचा गेल्या 52 आठवड्यांतील उच्चांक 4,825 रुपये एवढा आहे.

1958 मध्ये सुरू झालेली ट्रान्समिशन केबल, स्पेशिअलिटी ऑइल्स, पॉलिमर्स आणि कंडक्टर्स तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने गेल्या काही दिवसांत बम्पर परतावा दिला आहे. एक वेळ अपार इंस्‍ट्रीजचा शेअर 4 रुपयांवर होता. तो गुरुवारी 4703.60 रुपयांवर पोहोचला आहे.

अपार इंडस्ट्रीजचा शेअर 10 ऑगस्ट 2001 रोजी बीएसई (BSE) वर 4.01 रुपयांवर होता. तो 17 ऑगस्ट 2023 रोजी 4703.60 रुपयांवर पोहोचला.

या शेअरमध्ये एक लाख टक्क्यांपेक्षाही अधिकची तेजी आहे. जर एखाद्याने 2001 मध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याला 24937 शेअर मिळाले असतील.

जर त्या व्यक्तीने या शेअरमधील गुंतवणूक आतापर्यंत काय ठेवली असती, तर आता त्याचे 11.72 कोटी रुपये झाले असते. अर्थात या शेअरने 22 वर्षांतच एक लाखाचे 11 कोटींच्याही वर परतावा दिला आहे, या 4 रुपयांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हा शेअर सातत्याने जबरदस्त परतावा देत आहे. गेल्या 22 वर्षांच्या व्यतिरिक्त, आपण गेल्या पाच वर्षांचा विचार केला, तर या शेअरने जवळपास 700 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरातच या शेअरमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हा शेअर 18 ऑगस्ट 2022 रोजी 1188 रुपयांवर बंद झाला होता. तो 17 ऑगस्ट 2023 रोजी 4703 रुपयांवर पोहोचला. आता सहा महिन्यांचा विचार केल्यास, हा शेअर 2,345 रुपयांवरून 4,700 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात गेल्या केवळ सहा महिन्यांतसुद्धा या शेअरने 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

गेल्या केवळ तीन वर्षांतच या शेअरने 1400 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 4825 रुपये आणि निचांक 1172.80 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)