11 रुपयांच्या शेअरची कमाल, रोजच्या रोज करतोय मालामाल; BSE नं मागितलं स्पष्टीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:17 PM2022-06-04T17:17:10+5:302022-06-04T18:18:50+5:30

गेल्या काही दिवसांपासून Hindustan Motorsच्या शेअर्सची जबरदस्त खरेदी सुरू आहे.

शेअर बाजारात विक्रीचे वातावरण असतानाच, काही पेनी स्टॉक्सचा परफॉर्मन्स आश्चर्यचकित करणारा आहे. अशाच एका स्टॉकचे नाव आहे हिंदुस्थान मोटर्स (Hindustan Motors).

गेल्या काही दिवसांपासून Hindustan Motorsच्या शेअर्सची जबरदस्त खरेदी सुरू आहे. अचानक वाढलेल्या या खरेदीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जने हिंदुस्थान मोटर्सला स्पष्टीकरण मागितले आहे.

52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर - हिंदुस्थान मोटर्सचा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे. बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 18.20 रुपये आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या 5 दिवसांत हिंदुस्थान मोटर्सच्या शेअरवर अपर सर्किट दिसून आले आहे.

जेव्हा एखाद्या शेअरची खरेदी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक होते, तेव्हा त्या शेअरला अपर सर्किट लागते. अपर सर्किटनंतर, गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्यासाठी पुढील दिवसाची वाट पाहावी लागते.

10 दिवसांपूर्वी होती अशी स्थिती - Hindustan Motors च्या शेअरचा विचार करता, गेल्या 10 दिवसांपूर्वी या शेअरची किंमत 11 रुपये एवढी होती. यानंतर, या शेअरमध्ये जी तेजी दिसून आली, ती अद्यापही कायम आहे.

गेल्या तीन आठवड्यांत, या स्टॉकने 9.83 रुपयांवरून 77 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या शेअरने 8 एप्रिल 1992 रोजी 111 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

मागितलं स्पष्टीकरण - यातच, स्टॉकमधील अस्थिरतेबाबत बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जने हिंदुस्थान मोटर्सकडून स्पष्टीकरण मागवले आहे. बीएसईवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना कंपनीबद्दल अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे हितही जपले जाईल.