बिग बींनी छोट्या कंपनीवर लावलाय मोठा डाव, 3 लाख शेअर खरेदी केले; मिळतोय बम्पर परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:27 PM2023-03-03T18:27:21+5:302023-03-03T18:34:02+5:30

अमिताभ बच्चन यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 3,32,800 शेअर्स अथवा 2.45 टक्कके वाटा आहे....

बॉलिवूडचे बादशहा म्हणून ओखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी एका छोट्या कंपनीत पैसे गुंतवले होते. यावर त्यांना जबरदस्त नफा मिळाला आहे. ही कंपनी वायर मॅन्युफॅक्चरिंगचे काम करत असून नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे. या कंपनीचे नाव आहे, डीपी वायर्स.

Ace Equity वर उपलब्ध डेटानुसार, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे डीपी वायर्सचे तब्बल 3,32,800 शेअर्स अथवा 2.45 टक्कके हिस्सेदारी आहे. अमिताभ यांच्याकडे सप्टेंबर 2018 पासून या कंपनीचे शेअर्स आहेत.

कंपनीच्या शेअर्सनी 5 वर्षांत दिला 5 पट परतावा - डीपी वायर्सच्या शेअरने 4.87 पटींनी उसळी घेतली आहे. डीपी वायर्सचा शेअर 3 सप्टेंबर 2018 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) 74 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. 3 मार्च 2023 रोजी कंपनीचा शेअर 359.85 रुपयांवर पोहोचला आहे.

डीपी वायर्सच्या शेअर्सनी उसळी घेतल्यानंतर, आता कंपनीचे मार्केट कॅप 488.92 कोटी रुपयांवर गेले आहे. सप्टेंबर 2018 मध्ये हे 100.40 कोटी रुपये होते. अशी माहिती बिझनेस टुडेच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आली आहे. डीपी वायर्सच्या शेअरचा उच्चांक 502.80 रुपये आहे.

कंपनीत रिटेल इन्व्हेस्टर्सचा वाटा 8.88 टक्के - डीपी वायर्समध्ये प्रमोटर्सचा वाटा 70.40 टक्के एवढा आहे. हा आकडा 31 डिसेंबर 2022 च्या शेअरहोल्डिंगचा आहे. कंपनीमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचा वाटा 8.88 टक्के एवढा आहे. हाय नेटवर्थ इंडीव्हिजुअल्सचा कंपनीत 8.85 टक्के वाटा आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचे नेट सेल्स 25.70 टक्क्यांनी वाढून 613.24 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2017 मध्ये कंपनीचे नेट सेल्स 195.38 कोटी रुपये होते. तसेच कंपनीचा नफा 5.02 कोटींनी वाढून आता 29.05 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

स्टील वायर आणि प्लास्टिक फिल्म्स तयार करते कंपनी - मध्य प्रदेशातील ही कंपनी स्टील वायर्स आणि प्लास्टिक फिल्म्सचे मॅन्युफॅक्चरिंग आणि पुरवठा करते. ही कंपनी ऑईल अँड गॅस, पॉवर, एनव्हायरन्मेट, सिव्हिल, एनर्जी, ऑटोमोबाईल आणि इंफ्रास्ट्रक्चर सेक्टरला सप्लाय करते. कंपनीने तयार केलेल्या प्लास्टिक प्रॉडक्ट्सचा वापर लँडफिल्स, हायवे अँड रोड कंस्ट्रक्शन्स, पॉन्ड्स, टँक्स मध्येकेला जातो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)