बाप रे बाप...! हा शेअर आहे की पैसा छापायचं मशीन? 4 महिन्यांत ₹1000 चे केले ₹9 कोटी! दिला 94,16,329% परतावा By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 05:19 PM 2024-11-10T17:19:56+5:30 2024-11-10T17:23:03+5:30
महत्वाचे म्हणजे, हा शेअर देशातील सर्वात महागडा शेअर बनला आहे... सध्या शेअर बाजारात एक पेनी स्टॉक हॉट टॉपिक बनला आहे. या शेअरच्या परफॉर्मन्सने सर्वांनाच चकित केले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. महत्वाचे म्हणजे, हा शेअर देशातील सर्वात महागडा शेअर बनला आहे.
हा शेअर बीएसईवर गेल्या शुक्रवारी 332399.95 रुपयांवर पोहोचला आहे. ही या शेअरची 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी आहे. हा शेअर आहे, एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा (Elcid Investments Share).
या स्टॉकच्या किंमतीची माहिती मिळवण्यासाठी 29 ऑक्टोबरपासून एका विशेष कॉल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा शेअर गेल्या 29 ऑक्टोबरला 2,36,250 रुपयांवर पोहोचला होता. विशेष कॉल लिलावापूर्वी, 21 जून, 2024 रोजी हा शेअर बीएसईवर केवळ 3.53 रुपयांना बंद झाला होता. अर्थात या कालावधीत हा शेअर 94,16,329% टक्क्यांनी वधारला आहे.
अर्थात, या कालावधीत एखाद्या व्यक्तीने, या शेअरमध्ये 1 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर तिचे 9 कोटी रुपये झाले असते.
महत्वाचे म्हणजे, आता या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीच्या बोर्ड मेंबर्सची बैठक आहे. यात जुलै-सप्टेंबर 2024 तिमाही निकालांचा विचार करून मान्यता दिली जाईल. आमच्या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी 12 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
सातत्याने वाढतोय भाव - एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा शेअर मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर पुन्हा सूचीबद्ध झाले. शेअरची लिस्टिंग किंमत 2,25,000 रुपये होती, परंतु ट्रेडिंग दरम्यान ती 5 टक्क्यांनी वाढून तो 2,36,250 रुपयांवर पोहोचला. तेव्हापासून तो सतत अप्पर सर्किट मारत आहे, यामुळे या शेअर्सची किंमत सध्या 332,399.95 रुपयांवर पोहोचली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)