बाजारात या शेअरनं रचला इतिहास, एकाच दिवसात ₹13,520 रुपयांनी वाढला भाव! गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:02 PM2024-01-17T18:02:37+5:302024-01-17T18:09:03+5:30

ही कंपनी आज केवळ टायरच नाही तर, ट्यूब, पेंट्स, कन्व्हेयर बेल्ट आणि खेळणी देखील तयार करते...

टायर बनवणारी कंपनी एमआरएफच्या शेअरने बुधवारी व्यवहारादरम्यान इतिहास रचला. कंपनीच्या शेअर्समध्ये आज इंट्राडे ट्रेडमध्ये 10% अर्थात 13,520.7 रुपयांनी वाढ झाली आणि तो 1.5 लाख रुपयांवर पोहोचला. ही या शेअरची आजपर्यंतची सर्वोच्च किंमत आहे.

यापूर्वी मंगळवारी हा शेअर 136479.30 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचे मार्केट कॅप 57,037.58 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

महत्वाचे म्हणजे, आज शेअर बाजारात या वर्षातील सर्वात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. BSE सेन्सेक्स 1,628.01 अंकांनी घसरून 71,500.76 वर पोहोचला आहे. तर, NSE निफ्टी देखील 460.35 अंकांनी घसरून 21,571.95 अंकांवर आला आहे.

सर्वात महागडा शेअर - MRF शेअर हा भारतातील सर्वात महागडा शेअर आहे. MRF शिवाय, पेज इंडस्ट्रीज (37,770 रुपये), हनीवेल ऑटोमेशन इंडिया (37,219 रुपये), 3एम इंडिया (34,263 रुपये) आणि श्री सीमेंट (26,527 रुपये) हे भारतातील इतर सर्वात महागडे शेअर आहेत.

सप्टेंबर तिमाहीचे परिणाम - कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 374% एवढी आश्चर्यजनक वृद्धि दिसून आली आहे. जी गेल्या वर्षातील याच कालावधीतील ₹123.9 कोटींवरून ₹587 कोटींवर पोहोचली आहे.

आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग महसूलात वार्षिक 6.71% वाढ झाली असून ₹6,217 कोटींवर पोहोचला आहे.

महत्वाचे म्हणजे एमआरएफ टायर जगातील 65 देशांमध्ये विकले जातात. कंपनीची परदेशी निर्यात सुमारे तीन अब्ज डॉलर्स एवढी आहे. ही कंपनी आज केवळ टायरच नाही तर, ट्यूब, पेंट्स, कन्व्हेयर बेल्ट आणि खेळणी देखील तयार करते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)