तुफान परतावा! 35 पैशांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 25 कोटी; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:37 PM2023-06-23T17:37:22+5:302023-06-23T17:48:02+5:30

आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यात आपण 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 25 कोटींहून अधिक झाले असते.

शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मात्र, आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यात आपण 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 25 कोटींहून अधिक झाले असते.

एअर कूलर तयार करणारी कंपनी सिम्फनीच्या शेअर्सने (Symphony Share Price) आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. गेल्या काही दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 259000 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

35 पैशांवरून 900 रुपयांवर पोहोचला शेअर - संबंधित कालावधीत 35 पैशांचा शेअर वधारून 900 रुपयांच्याही पुढे गेला आहे. कंपनीच्या 52 आठवड्यांतील उच्चांकासंदर्भात बोलायचे झाल्यास, तो 1,219.00 रुपये एवढा आहे. तर 52 आठवड्यांतील निचांक 820.60 रुपये एवढा आहे.

2003 मध्ये केवळ 35 पैशांना होता हा शेअर - या कंपनीच्या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 11 जुलै 2003 रोजी बीएसईवर 35 पैशांवर होता. तो आज 23 जून 2023 रोजी 902 रुपयांवर आहे.

जर या कालावधीत एखाद्या गुंतवणूकदारांने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 25.9 कोटी रुपये झाली असती.

15 वर्षांत झाले असते 2.6 कोटी - गेल्या 15 वर्षांचा विचार करता, या कालावधीत या शेअरमध्ये तब्बल 26721 टक्क्यांची तेजी आली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे 2.6 कोटी रुपये झाले असते.

2011 पासून आता पर्यंत 721.65 टक्क्यांची वाढ - 17 जून 2011 रोजी कंपनीचा शेअर 109 रुपयांवर होता. तेव्हा पासून आतापर्यंत या शेअरमध्ये 721.65 टक्के, अर्थात 791.87 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय हा शेअर एका महिन्यात 3.86 टक्के, 6 महिन्यात 2.49 टक्के तसेच एका वर्षात 7.21 टक्के वधारला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)