याला म्हणतात परतावा! 1 रुपयाचा शेअर 75 रुपयांवर पोहोचला; 5 वर्षांत 1 लाखाचे केले 60 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 08:53 PM2023-10-07T20:53:47+5:302023-10-07T21:00:07+5:30

ही कंपनी बायो-मेडिकल वेस्टचे डिस्पोझल, पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा पुरवठा आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट्सच्या कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये काम करते...

शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीतच मालामाल केले आहे. यातच एक शअर आहे स्मॉल कॅप कंपनी सन्मित इंफ्राचा (Sanmit Infra). हा 1 रुपयांचा शेअर 5 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत 75 रुपयांवर पोहोचला आहे.

या शेअरने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5900 टक्क्यांचा परतावा दिला आहे. सन्मित इंफ्रा (Sanmit Infra) बायो-मेडिकल वेस्टचे डिस्पोझल, पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा पुरवठा आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट्सच्या कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये काम करते.

कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 94.74 रुपये एवढा आहे. तर, निचांक 52 रुपये आहे.

₹1 लाखाचे केले ₹60 लाख - सन्मित इंफ्राचा शेअर 21 डिसेंबर 2018 रोजी 1.31 रुपयांवर होता. तो 6 ऑक्टोबर 2023 रोजी 78.61 रुपयांवर बंद झाला. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 5900 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 21 डिसेंबर 2018 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे मुल्य 60 लाख रुपये एवढे झाले असते.

4 वर्षांत 2500% टक्क्यांचा परतावा - सन्मित इंफ्राच्या शेअरमध्ये 4 वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 8 नोव्हेंबर 2019 लोजी 3 रुपयांवर होता. तो 6 ऑक्टोबर 2023 रोजी 78.61 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरने गेल्या 4 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2520 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

गेल्या 3 वर्षांचा विचार करता, सन्मित इंफ्राच्या शेअरमध्ये 446 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तसेच, गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 43 टक्क्यांची तेजी आली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 1240 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)