केवळ दीड रुपयांचा शेअर चक्क परीस बनला...! पाच वर्षात 44,766% परतावा दिला, गुंतवणूकदारांना केलं करोडपती By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:30 PM 2024-03-12T12:30:19+5:30 2024-03-12T12:46:48+5:30
एका वर्षांपूर्वी इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरची किंमत 33.80 रुपयांवर होती... शेअर बाजारात सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्स बंपर परतावा देत आहेत. अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला एका अशाच शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत. या शेअरने केवळ 5 वर्षांतच गुंतवणूकदारांना करोडपती अथवा कोट्यधीश केले आहे.
या शेअरचे नाव आहे इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड (Integrated Industries Ltd.) इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरने केवळ एका वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना 1,845.02 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
एकावर्षात दिला 1800% हून अधिकचा परतावा - एका वर्षांपूर्वी इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरची किंमत 33.80 रुपयांवर होती आणि अवघ्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1800 हून अधिकचा परतवा दिला आहे. एका वर्षांतच या कंपनीचा शेअर 621.25 रुपयांनी वधारून 655.05 रुपयांवर पोहोचला आहे.
2019 मध्ये 1.46 रुपयांवर होता शेअर - 29 मार्च 2019 रोजी कंपनीचा शेअर 1.46 रुपयांवर होता. तसेच, 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44,766.44 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदारांने त्यावेळी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 44,76,600 रुपये झाले असते. तसेच, जर एखाद्याने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, ती व्यक्ती आता कोट्यधीश झाली असती.
काय करते कंपनी? - ही कंपनी फूड प्रोडक्ट्सचे मॅन्युफॅक्चरिंग आणि फूड प्रोडक्ट्सचे ट्रेडिंग करते. सध्या कंपनीचा फोकस या दोन सेगमेंटवरच आहे. फूड प्रोडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगचे काम या कंपनीची उपकंपनी असलेल्या Nurture Well Foods Pvt. Ltd कडून केले जाते. ही कंपनी बिस्किट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाशी संबंधित आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)