Multibagger Stock: बम्पर रिटर्न! एक लाखाच्या गुंतवणुकीवर मिळाला तब्बल 2 कोटींहून अधिकचा परतावा; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 01:33 PM2022-07-25T13:33:53+5:302022-07-25T13:42:14+5:30

जाणून घेऊयात रिअल इस्टेट सेक्टरशी संबंधित या शेअर संदर्भात...

शेअर बाजारात एक म्हण अत्यंत प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, 'जेथे रिस्क अधिक तेथे परतावा जास्त.' काहीसे असेच बघायला मिळाले आहे, नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) लिमिटेडच्या (National Standard India Limited Share Price) शेअर्ससंदर्भात.

या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना एका झटक्यात कोट्यधीश बनवले आहे. कधीकाळी केवळ 21 रुपयांना मिळणाऱ्या या शेअरची किंमत आता वाढून 5400 रुपयांवर पोहोचली आहे. तर जाणून घेऊयात रिअल इस्टेट सेक्टरशी संबंधित या शेअर संदर्भात...

या स्टॉकनं बदललं गुंतवणूकदारांचं नशीब - 23 जानेवारी 2018 रोजी या कंपनीच्या स्टॉकची किंमत BSE वर केवळ 21.90 रुपये एवढी होती. ती वाढून आता 5400 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, या काळात या स्टाॅकच्या किंमतीने तब्बल 24,453.84 टक्क्यांची उसळी घेतली आहे.

तसेच, गेल्या एका वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 4098.30 रुपये एवढी होती. जी आता वाढून 5400 रुपयांवर आहे. अर्थात गेल्या एका वर्षाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या स्टॉकने गुंतवणूकदारांना 315.57 टक्के एवढा परतावा दिला आहे.

खरे तर, गेली 6 महिने या स्टाॅकसाठी म्हणावी तशीराहिली नाहीत. या काळात नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स 49.57 टक्क्यांनी घसरले.

एक महिन्यापूर्वी ज्या गुतंवणूकदारांनी नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली असेल, त्याला आज नुकसान सहन करावे लागले असेल. या काळात गुंतवण्यात आलेल्या एक लाख रुपयांचे 89 हजार रुपये झाले आहेत. तसेच, एका वर्षापूर्वी करण्यात आलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक आता वाढून 4.16 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) लिमिटेडच्या शेअरचा भाव जेव्हा 21.90 रुपयांवर होता, तेव्हा यात ज्या गुंतवणूकदारांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, तर त्याचा परतावा आता कोटी रुपयांच्याही पुढे गेला आहे. आज ते एक लाख रुपये वाढून 2.46 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.

कंपनीचे काम काय? नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) लिमिटेड ही एक रिअल इस्टेटशी संबंधित काम करणारी स्माॅल कॅप कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप 10,801.20 कोटी रुपयांचे आहे. व्हॅल्यू रिसर्चनुसार ही एक कर्ज मुक्त कंपनी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)