शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांवर पाडतोय पैशांचा धो-धो पाऊस; दिला 123720 टक्क्यांचा बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 03:50 PM2024-01-15T15:50:33+5:302024-01-15T16:02:17+5:30

हा स्टॉक आज 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 309.55 रुपयांवर खुला झाला.

हरियाणातील दारू बनवणारी कंपनी पिकॅडिली अॅग्रो लिमिटेडच्या शेअरमध्ये आजही जबरदस्त तेजी दिसून येत आहे. या शेअरला आजही अप्पर सर्किट लागले आहे. हा स्टॉक आज 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 309.55 रुपयांवर खुला झाला.

या शेअरने आपल्या गुंतवणूक दारांचा पैसा जवळपास साडेचार पटहून अधिक वाढवला आहे. या कालावधीत या शेअरने एक लाख रुपयांचे 4.61 लाख रुपये केले आहेत.

महत्वाचे म्हणजे या कंपनीला जगातील सर्वात चांगली व्हिस्की बनवणारी कंपनी म्हणून खिताब मिळाला आहे. पिकॅडिली अॅग्रो लिमिटेडचा ब्रँड इंद्री दिवाली 2023 अॅडिशनला सर्वश्रेष्ठ व्हिस्की अवार्ड मिळाला आहे.

एख लाख टक्क्यांहून अधिक परतावा - महत्वाचे म्हणजे या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ साडे चार वर्षांतच एक लाख टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तसेच सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा विचार करता, 11 जुलै 1997 ला हा शेअर केवळ 25 पैशांवर होता. तो आता 309.55 रुपयांवर पोहोचला आहे.

या कालावधीत या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 123720 टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे.

पिकॅडिली अॅग्रो लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 5 दिवसांत 16 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने एक लाख रुपयाचे 6.48 रुपये केले आहेत. अर्थात साडे सहा पट परतावा देऊन हा शेअर मल्टीबॅगर स्टॉक्सच्या यादित पोहोचला आहे.

महत्वाचे म्हणजे, सर्वश्रेष्ठ व्हिस्कीचा अवार्ड मिळताच कंपनीचा शेअर रॉकेट बनला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 328 रुपये तर निचांक 38.70 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)