शेअर आहे की पैसे छापायचं मशिन! TATA च्या या स्टॉकनं केलं मालामाल, गुंतवणूकदारांची झाली चांदी By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:36 PM 2023-08-07T17:36:56+5:30 2023-08-07T17:43:23+5:30
लार्ज कॅप स्टॉक्सदेखील कमी कालावधीत मल्टीबॅगर्स स्टॉक्स बनू शकतात. यात पैसे बुडण्याचा धोकाही कमी असतो आणि यातच टाटा सारखे एखादे मोठे नाव असेल तर काय सांगायचे... केवळ पेनी आणि स्मॉल कॅप स्टॉक हेच मल्टीबॅगर स्टॉक बनू शकतात, असे लोकांना वाटते. मात्र, असे नाही. लार्ज कॅप स्टॉक्सदेखील कमी कालावधीत मल्टीबॅगर्स स्टॉक्स बनू शकतात. यात पैसे बुडण्याचा धोकाही कमी असतो आणि यातच टाटा सारखे एखादे मोठे नाव असेल तर काय सांगायचे...
आम्ही आपल्या टाटा ग्रुपच्या एका अशा शेअरसंदर्भात माहिती देत आहोत, ज्याने अत्यंत कमी कालावधीत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरचे नाव आहे, टाटा पॉवर लिमिटेड. या शेअरने गेल्या 3 वर्षांत 375 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
3 वर्षांत 374 टक्के परतावा - टाटा पॉवरच्या शेअर 6 ऑगस्ट 2020 रोजी 49.65 रुपयांवर बंद झाला होता. तो आज 235 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. अशाप्रकारे, या कालावधीत या शेअरने 374 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या तुलनेत सेन्सेक्सने तीन वर्षांत केवळ 74.38 टक्के एवढाच परतावा दिला आहे.
3 महिन्यांत 15.66 टक्के परतावा - टाटा पॉवरच्या शेअरने गेल्या एका वर्षात 3.49 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा शेअर या वर्षात आतापर्यंत 13.46 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. तसेच, गेल्या 3 महिन्यांत या शेअरने 15.66 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.
गेल्या 5 वर्षांचा विचार करता, या शेअरने 239 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा तीन वर्षांच्या परताव्या पेक्षा कमी आहे. 52 आठवड्यांतील 182.45 या निचांकाशी तुलना करता, हा शेअर आतापर्यंत 29 टक्क्यांनी वधारला आहे.
74,818.88 कोटी रुपये मार्केट कॅप - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी टाटा पॉवरचा शेअर 0.66 टक्के अथवा 1.55 रुपयांनी घसरून 234.10 रुपयांवर ट्रेड करताना दिसला. हा शेअर आज 237.85 रुपयांवर खुला झाला होता. व्यवहारादरम्यान कंपनीचे मार्केट कॅप बीएसईवर 74,818.88 कोटी रुपये होते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)