Paytm ने पुन्हा निराशा केली! RBI च्या कारवाईनंतर धक्के पे धक्का; १३ टक्के शेअर घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:27 PM2022-03-14T15:27:47+5:302022-03-14T15:31:30+5:30

Paytm चे १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल ४४ हजार कोटींपर्यंत खाली आले आहे. पाहा, डिटेल्स...

रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात अनेकविध IPO आले. अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना मालामाल केले, तर काही आयपीओंमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याचे पाहायला मिळाले.

Paytm हा यामधीलच एक IPO आहे. कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होऊनही या कंपनीचा शेअर घसरतच चालल्याचे दिसत आहे. पेटीएमच्या गुंतवणूकदारांना आज शेअर बाजारात जोरदार झटका बसला आहे. आज सकाळी बाजार सुरु होताच वन ९७ कम्युनिकेशनचा शेअर १३ टक्क्यांनी कोसळला.

Paytm शेअरचे मूल्य ७० टक्क्यांनी कोसळले आहे. सध्या शेअर बाजारात वन ९७ कम्युनिशेन्सचा भाव ६९३.९० रुपये आहे. त्यात १०. ५२ टक्के घसरण झाली आहे. बाजार खुला होताच वन ९७ कम्युनिशेन्सचा भाव १३ टक्के घसरण झाली.

Paytm चा शेअर गेल्या आठवड्यात ७७४.८० रुपयांवर बंद झाला होता. अनेक ब्रोकर कंपन्यांनी पेटीएमचे शेअर मूल्य ६५० ते ७०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

अलीकडेच Paytm पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे. बँकेवर ही कारवाई करण्यात आली. पेटीएम पेमेंट बँकेचा आयटी लेखा परीक्षण अहवाल तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

यासाठी आयटी ऑडिट कंपनीची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. या कारवाईचा शेअरवर परिणाम होणार असा अंदाज गुंतवणूक विश्लेषकांनी व्यक्त केला होता.

कामकाजाच्या समीक्षेदरम्यान त्यांच्या काही देखरेखीसंबंधी चिंता समोर आल्या. याचा आधारवर हा निर्णय घेण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. Paytm Payment Bank ला पुन्हा नवीन ग्राहक जोडण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय आता आयटी ऑडिटर्सच्या अहवालाच्या पडताळणीनंतर मिळणाऱ्या विशेष परवानगीवर अवलंबून असणार आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्सने शेअर बाजारात आयपीओ आणला होता. कंपनीने समभाग विक्रीतून १८३०० कोटींचे भांडवस उभारले होते. आयपीओसाठी प्रती शेअर २१३० रुपये भाव ठेवण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात शेअर नोंदणीवेळी तो १९ टक्के गडगडला.

त्यानंतर मागील चार महिन्यात त्यात प्रचंड घसरण झाली आहे. पेटीएमचे आयपीओवेळी १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल होते ते आता ४४००० कोटी इतके खाली आले आहे.