शेअर असावा तर असा! 1 वर्षात 1000% परतावा दिला, ₹12 वरून ₹150 वर गेला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 07:19 PM2024-01-20T19:19:07+5:302024-01-20T19:28:37+5:30

महत्वाचे म्हणजे, कंपनीचा शेअर 17 जानेवारीपासून अपर सर्किटवर आहे.

पेनी स्टॉक सीनिक एक्सपोर्ट्स (Ceenik Exports)च्या शेअरची किंमत गेल्या एका वर्षात तब्बल 1096 टक्क्यांनी वधारली आहे. जानेवारी 2023 मध्ये हा शेअर 12.35 रुपयांवर होता. तो आता 150.60 रुपयांपर्यंत वाधारला आहे. आज अर्थात शनिवारी कंपनीच्या शेअरला 2 टक्क्यांच्या अपर सर्किटला लागले आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे 1.19 लाख रुपये झाले असते. महत्वाचे म्हणजे, कंपनीचा शेअर 17 जानेवारीपासून अपर सर्किटवर आहे.

1 वर्षात 1000% हून अधिकचा परतावा - हा शेअर शनिवारी सकाळी 150.60 रुपयांवर होता. 52 आठवड्यांच्या 9.76 रुपयांच्या (एप्रिल 2023) निचांकापासून आतापर्यंत या शेअरमध्ये 1413 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. जानेवारी महिन्यातच या शेअरमध्ये तब्बल 34 टक्क्यांची तेजी दिसून आली.

ऑगस्टपासून आतापर्यंत 1118% ची तेजी - ऑगस्ट 2023 पासून ते आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 1118 टक्यांनी वधारली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 103.50 टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यात पोझिशनल गुंतवणूकदारांना 51 टक्क्यांचा पायदा झाला आहे.

गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 1872 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. तसेच, गेल्या 5 वर्षांत या पेनी स्टॉकच्या किंमतीत 1767 टक्क्यांची तेजी आली आहे. या कंपनीची स्थापना 1995 झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)