याला म्हणतात पैशांचा धो-धो पाऊस...! ₹2 च्या शेअरची कमाल, देतोय 'तुफान' परतावा; एनर्जी सेक्टरमध्ये काम करते कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 01:41 PM 2024-06-26T13:41:29+5:30 2024-06-26T13:57:57+5:30
पेनी कॅटेगरीच्या या स्टॉकने गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना थक्क करणारा परतावा दिला आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असा एक शेअर म्हणजे, पॉवर जनरेशनशी संबंधित कंपनी सुराना टेलीकॉम अँड पॉवरचा.
पेनी कॅटेगरीच्या या स्टॉकने गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना थक्क करणारा परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 796 टक्क्यांनी वधारली आहे. जून 2020 मध्ये या शेअरची किंतम केवळ ₹2.95 होती. ती वाढून आता ₹26.45 वर पोहोचली आहे.
केव्हा किती परतावा? - गेल्या 5 वर्षांचा विचार करता, हा शेअर 494 टक्यांनी वधारला आहे. हा शेअर जून 2019 मध्ये ₹4.05 वर होता. तो आता 26 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे गेल्या केवळ 3 वर्षांत, या शेअरने 259 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच जून 2021 मध्ये हा शेअर ₹6.70 वर होता, तो आता 26 रुपयांवर पोहोचला आहे.
या वर्षात किती दिला परतावा - गेल्या काही दिवसांतही सुराना टेलीकॉम अंड पॉवरने आपल्या गुंतणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या वर्षातं 172 टक्के तर 2024 मध्ये वार्षिक आधारावर 56 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
या शेअरने या वर्षांत गेल्या 6 महिन्यांपैकी 4 महिन्यांत पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गेल्या मे महिन्यात 18 टक्के आणि एप्रिल महिन्यात 2 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर, जून महिन्यात जवळपास 35 टक्क्यांनी वधारला.
तत्पूर्वी मार्च महिन्यात या शेअरमध्ये 18 टक्के आणि फेब्रुवारी महिन्यात 5.5 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. जानेवारी 2024 मध्ये हा शेअर 23 टक्क्यांनी वधारला होता.
सुराना टेलीकॉम अँड पॉवरने ₹26.57 चा उच्चांक गाठला आहे. 14 जुलै, 2023 रोजी नोंदवल्या गेलेल्या 52-आठवड्यांच्या ₹8.68 या निचांकापासून या शेअरने 206 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
सुराना टेलीकॉम अँड पॉवर लिमिटेड ही भारतात सौर आणि पवन ऊर्जेचे उत्पादन, विक्री आणि सौर मॉड्यूलचा व्यापार करते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)