Tata समूहाच्या या कंपनीत पैसा लावणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 1 लाखाच्या बदल्यात मिळतायत 7 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:36 PM2023-07-13T15:36:11+5:302023-07-13T15:48:54+5:30

जर आपण या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 7 कोटी रुपये झाले असते.

टाटा समूहाची (Tata Group) कंपनी असलेल्या टायटनच्या (Titan) शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. जर आपण या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 7 कोटी रुपये झाले असते.

ज्या गुंतवणूकदारांची टायटनचे शेअर्स विकत घेण्याची इच्छा असेल, त्यांना अजून संधी आहे. या शेअरची किंमत 3200 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आज कोणत्या पातळीवर आहे शेअर? - टायटनचा शेअर आज (गुरुवारी) 3,094.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. गेल्या एका महिन्यात टायटनच्या शेअरमध्ये 6.23 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. या काळात शेअरच्या किंमतीत 181.50 रुपयांची वाढ झाली आहे.

3200 च्या पार जाणार टायटनचा शेअर - तज्ज्ञांनी टायइनच्या शेअरसाठी 3242 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे. मात्र, कुठल्याही स्टॉकमध्ये पैसा लावण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. याच वेळी, टायटनच्या शेअरला मॉर्गन स्टेनलीने डाउनग्रेड रेटिंग दिली आहे.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुरू केले जाणार टायटन स्टोर - महत्वाचे म्हणजे, टाटा समूहाची कंपनी टायटन (Titan) चालू आर्थिक वर्षात आपल्या ज्वेलरी ब्रँड तनिष्कचे (Tanishq) 18 नवे इंटरनॅशनल स्टोर्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. यांपैकी अधिकांश स्टोअर्स खाडी देशांमध्ये सुरू केले जातील. यानंतर, इंटरनॅशनल लेव्हलवर टायटनच्या स्टोअर्सची संख्या 25 वर पोहोचेल.

असा आहे, कंपनीचा फ्यूचर प्लॅन - टायटनने म्हटले आहे, आर्थिक वर्ष 2023-24 च्या अखेरपर्यंत 25 आंतरराष्ट्रीय स्टोअर सुरू करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. तनिष्कने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय तनिष्क स्टोर्सची संख्या 2 वरून 7 वर नेली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, तनिष्कचे लक्ष्य एनआरआय/पीआयओ बाजारातील मुख्य ज्वेलरी ब्रँड बनने आहे.

टाटा ग्रुप समूहाने गेल्या वर्षात दुबईमध्ये चश्मा ब्रँड ‘टायटन आय प्लस’ (Titan Eye+) चे आपले पहिले आंतरराष्ट्रीय स्टोरदेखील सुरू केले होते. आणखी स्टोअर्स सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.े

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)