४ रूपयांचा शेअर पोहोचला २४३९ रूपयांवर; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ५.७० कोटी, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:23 PM2022-02-08T19:23:50+5:302022-02-08T19:36:45+5:30

Multibagger Stock Tata Titan: लाँचपासून या शेअरनं आतापर्यंत दिला ५७००० टक्क्यांचा रिटर्न.

जर तुमच्यात संयम असेल तर तुम्ही शेअर बाजारातून (Stock Market) कोट्यधीश देखील होऊ शकता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Investors) 'खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा' या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.

म्हणून, एखाद्याने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो. टाटा समूहाची कंपनी टायटनचे (TATA Titan) शेअर्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शेअर्सने २३ वर्षांत ५७,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

टाटा समुहाचा हा स्टॉक (Tata Group stock) १ जानेवारी १९९९ रोजी ४.२७ रुपयांवर बंद झाला होता. परंतु ८ फेब्रुवारी २०२२ रोजी या शेअरची किंमत २४३६.५५ रूपयांवर पोहोचली. याचाच अर्थ या शेअरनं २३ वर्षांच्या कालावधीत ५७,०४१.६९ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

इतकंच नाही तर गेल्या १० वर्षांत या शेअरची किंमत २१०.१५ रूपयांवरून २४३६.५५ रूपयांवर आली आहे. यादरम्यान, या शेअरनं गुंतवणूकदारांना १०५९.६ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलंय.

१० फेब्रुवारी २०१७ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वीही या शेअरची किंमत ४३२ रूपये होती. आजच्या या शेअरची तुलना करता कंपनीनं गुंतवणूकदारांना ४६४.८० टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे.

परंतु गेल्या एका वर्षाच्या कामगिरी पाहिलं तर हा शेअर १५४१.७० रूपयांवरून २४३६.५५ रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरच्या किंमतीत ५८.२६ टक्क्यांची वाढ झालीये.

परंतु वर्ष दरवर्षे या हिशोबानं पाहिलं तर टायटनच्या शेअर्समध्ये ३.३२ टक्क्क्यांची घसरण झाली आहे. एका महिन्यातच हा शेअर तब्बल ८,१९ टक्के पडला. परंतु मंगळवारी या शेअरमध्ये १.२८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

टायटनच्या शेअर किमतीच्या पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्या १ लाखाचे आज ५.७० कोटी रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने १० वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते तर आज त्याच्या १ लाख रुपयां ११.५६ लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते, तर त्याचे १ लाख आज ५.६४ लाख झाले असते.

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने १ वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि या कालावधीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे १ लाख रुपये १.५८ लाख झाले असते.