बाजारातील भूकंपातही हे 6 पेनी स्टॉक ठरले 'भारी'! 5 दिवसांत 43 टक्क्यांपर्यंत दिला परतावा, किंमत ₹20 पेक्षाही कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 19:53 IST2024-12-22T19:47:45+5:302024-12-22T19:53:15+5:30

...या घसरणीतच 6 पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

गेल्या आठवड्याती पाच दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल 18.43 लाख कोटी रुपयांहून अधिकचा फटका बसला आहे. मात्र, या घसरणीतच 6 पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

1. फ्रँकलिन इंडस्ट्रीज - या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात सातत्याने तेजी दिसून आली. या कालावधीत या शेअरला रोज अप्पर सर्किट लागत होते. या शेअरला शुक्रवारीही 5% चे अप्पर सर्किट लागले होते आणि तो 3.15 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. या स्टॉक पाच दिवसांत 44% पर्यंत वधारला आहे. याचे मार्केट कॅप 91.10 कोटी रुपये एवढे आहे.

2. अँबी ट्रेड अँड फाइनान्स - या शेअरला शुक्रवारी (20 डिसेंबर) 20% चे अप्पर सर्किट लागले होते. कंपनीचा शेअर 18.24 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरने पाच दिवसांत 42% पर्यंत परतावा दिला आहे. त्याचे मार्केट कॅप 89.35 कोटी रुपये आहे.

3. एलजीबी फोर्ज - या शेअरमध्ये गेल्या शुक्रवारी 10% पर्यंतची तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 21.75 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, हा शेअर 18.02 रुपयांवर बंद झाला. पाच दिवसांत 41 टक्के वाढ झाली. याचे मार्केट कॅप 429.24 कोटी रुपये एवढे आहे.

4. संभव मेडिया लिमिटेड - कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी 15% हून अधिक वधारला होता. आणि ट्रेडिंग दरम्यान तो 9.25 रुपयांवर पोहोचला. हा शेअर पाच दिवसांत 36% ने वाढला आहे. याचे मार्केट कॅप 168.56 कोटी रुपये एवढे आहे.

5. मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड - कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी 5% ने वधारला. तो 3.03 रुपयांवर पोहोचला होते. या शेअरने पाच दिवसात 25% पर्यंत परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 60.60 कोटी रुपये एवढे आहे.

6. रिलायन्स होम फायनान्स - या अनिल अंबानी यांच्या कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांत 20 टक्क्यांहून अधिकने वाधारला आहे. गेल्या शुक्रवारी, तो 5% पर्यंत वाधारला आणि ट्रेडिंग दरम्यान 4.82 रुपयांवर पोहोचला. याचे मार्केट कॅप 219.99 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)