याला म्हणतात बम्पर रिटर्न! 1 लाखाचे झाले 100 लाख, 'या' स्टॉकनं दिला मल्टीबॅगर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:05 PM2023-03-19T20:05:50+5:302023-03-19T20:17:21+5:30

लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर मल्टीबॅगर (Multibagger) सिद्ध झाला आहे...

शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स आणि फ्रंट फोर्क्स सारखी राईड कंट्रोल प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या दिग्गज गॅब्रियल इंडिया या कंपनीच्या शेअर्सनी (Gabriel India Share) आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर मल्टीबॅगर (Multibagger) सिद्ध झाला आहे. मात्र असे असले तरी, या वर्षात गॅब्रियल इंडियाचे स्टॉक 22 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक आपल्या सध्याच्या लेव्हल पेक्षा 17 टक्क्यांनी वर जाऊ शकतो. शुक्रवारी हा स्टॉक बीएसईवर 3.68 टक्क्यांच्या तेजीसह 147.90 रुपयांवर बंद झाला होता. या कंपनीचे मार्केट कॅप 2124.49 कोटी रुपये एवढे आहे.

लॉन्ग टर्ममध्ये दिला बम्पर परतावा - गॅब्रियल इंडियाचा शेअर 2 नोव्हेंबर 2001 रोजी 1.35 रुपयांवर होते. आता हा स्टॉक 147.90 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या कंपनीच्या स्टॉकने एक लाख रुपयांचे 1.10 कोटी रुपये केले आहेत. या स्टॉकने लॉन्ग टर्ममध्ये बम्पर परतावा दिला आहे.

गेल्या वर्षात 12 मे 2022 रोजी हा स्टॉक 102.45 रुपयांवर होता. जो या स्टॉकचा एका वर्षातील निचांक आहे. तसेच, 52 आठवड्यांतील या शेअरचा उच्चांक 200.90 रुपये एवढा आहे. 29 नोव्हेंबर 2022 रोजी हा स्टॉक आपल्या उच्चांकावर पोहोचला होता.

एवढा घसरला भाव - खरे तर, 200.90 रुपयांच्या पातळीनंतर, या शेअरचा वेग मंदावला. हा शेअर आतापर्यंत आपल्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी घसरला आहे. पण असे असले तरी, बाजारातील तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात गॅब्रियल इंडियाच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळू शकते.

गेल्या पाच दिवसांत हा शेअर 1.69 टक्क्यांनी घसरला आहे. महिन्याचा विचार करता, हा शेअर 9.34 टक्क्यांनी घसरला. तर गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, हा शेअर 9.84 टक्क्यांनी कोसळला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)