याला म्हणतात धमाका! 35 रुपयांच्या पेनी स्टॉकनं केलं मालामाल, पहिल्याच दिवशी 98 रुपयांवर पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:42 PM2023-12-29T13:42:40+5:302023-12-29T14:00:51+5:30

हा शेअर 180 टक्क्यांच्या फायद्यासह 98.15 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे...

शेअर बाजारात ट्रायडंट टेकलॅब्स या छोट्या कंपनीने पहिल्याच दिवशी धमाका केला आहे. या कंपनीच्या शेअरने बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. ट्रायडन्ट टेकलॅब्सचा (Trident Techlabs) शेअर 180 टक्क्यांच्या फायद्यासह 98.15 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे.

कंपनीच्या आयपीओचा प्राइस ब्रॅड 33 ते 35 रुपये होता. आयपीओमध्ये कंपनीचा शेअर 35 रुपयांवर अॅलॉट झाला.

या आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांना हे शेअर अॅलॉट झाले आहेत, ते पहिल्याच दिवशीम मालामाल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा पहिल्याच दिवशी दुप्पट झाला आहे.

धमाकेदार एंट्रीनंतर कसळला शेअर - बाजारातील जबरदस्त एन्ट्रीनंतर, ट्रायडन्ट टेकलॅब्सचा (Trident Techlabs) शेअर कोसळला होता. हा शेअर 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 93.25 रुपयांवर पोहोचला आहे. ट्रायडन्ट टेकलॅब्सचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत ओपन होता.

ट्रायडन्ट टेकलॅब्सची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. कंपनी एयरोस्पेस, डिफेन्स, ऑटोमोटिव्ह, टेलिकम्युनिकेशन्स, सेमीकंडक्टर आणि पॉवर डिस्ट्रीब्यूशन इंडस्ट्रीजला टेक्नॉलॉजीवर आधारित सोल्यूशन्स उपलब्ध करून देते.

IPO वर लागला 763 पटहून अधिक डाव - ट्रायडन्ट टेकलॅब्सच्या आयपीओमध्ये लोकांनी मोठी गुंतवणूक केली होती. कंपनीचा IPO एकूण 763.30 पट सबस्क्राइब झाला. Trident Techlabs च्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 1059.43 पट सबस्क्राइब झाला. तसेच, नॉन-इंस्टिट्यूशनल इनव्हेस्टर्सचा कोटा 854.37 पट सब्सक्राइब झाला.

क्वॉलीफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) कॅटेगरीचा विचार करता, यात 117.91 पट डाव लागला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्स एका लॉटसाठी गुंतवणूक करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 4000 शेअर आहेत. अर्थात, रिटेल इन्व्हेस्टर्सना 140000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)