शेअर असावा तर असा! ₹5 च्या स्टॉकवर 1 लाख लावणाऱ्यांचे झाले 14 कोटी, खरेदीसाठी तुटून पडले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 03:46 PM2023-06-26T15:46:03+5:302023-06-26T15:53:56+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत, ज्या शेअरने एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल14 कोटी रुपयांहूनही अधिकचा परतावा दिला...

शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केले आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत, ज्या शेअरने एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना लाँग टर्ममध्ये 14 कोटी रुपयांहूनही अधिकचा परतावा दिला.

शेअरनं घेतला तूफानी स्पीड - गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवणारा हा शेअर बजाज समूहाच्या बजाज फायनान्सचा (Bajaj Finance) आहे. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी दिसून आली आहे.

बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance) शेअरने 149000 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कधी काळी 5 रुपयांवर असणारा हा शेअर, आज 6,986 रुपयांवर ट्रेड करत आहे.

या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. बजाज फायनान्सच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 7777 रुपये एवढा आहे. तर, निचांक 5340.05 रुपये एवढा आहे.

गुंतवणूकदार असे बनले कट्यधीश - बजाज फायनान्सचा शेअर 25 जुलै 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) केवळ 4.71 रुपयांवर होता. तो आज अर्थात 26 जून 2023 रोजी वधारून 6,969.25 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात या शेअरने तब्बल 149237 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 25 जुलै 2003 रोजी बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आजवर कायम ठेवली असती, तर त्याचे 14 कोटी रुपयांहून अधिक झाले असते. महत्वाचे म्हणजे या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने जबरदस्त परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)