share of high tech pipes rose from Rs 50 to Rs 854, Rs 1.50 lakh become Rs 25 lakh
50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख... By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 05:49 PM2023-01-09T17:49:09+5:302023-01-09T17:52:34+5:30Join usJoin usNext मोठा लाभ झाल्यानंतर आता कंपनीने योगी सरकारसोबत केला मोठा करार केला आहे. शेअर बाजारात एखाद्या कंपनीने जबरदस्त रिटर्न्ससह डिव्हिडेंड दिला, तर गुंतवणूकदारांचा डबल फायदा होतो. हाय-टेक पाइप्स(Hi-Tech Pipes) IPO त्याच कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने 2016 मध्ये शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतली होती. IPO दरम्यान कंपनीची इश्यू प्राइस फक्त 50 रुपये होती. पण, आता या शेअरची किंमत 854 रुपये झाली आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने या कंपनीचा आयपीओ घेतला असता, तर त्याला आतापर्यंत 1600 टक्के रिटर्न्स मिळाले असते. विशेष म्हणजे कंपनीने आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारसोबत एक एमओयू(MOU) साइन केला आहे. कंपनीच्या शेअर्सचा इतिहास- 50 रुपये इश्यू प्राइस असलेल्या कंपनीने 56 रुपयांसह मार्केटमध्ये एंट्री घेतली होती. म्हणजेच कंपनी जेव्हा एनएसई(NSE)मध्ये लिस्ट झाली, तेव्हा या शेअरने 10 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला. Hi-Tech Pipes च्या आयपीओदरम्यान लॉट साइज 3000 शेअर्सचा होता. म्हणजेच कोणत्याही गुंतवणूकदराला कमीत कमी 1.50 लाख रुपये खर्च करावे लागले होते. एखाद्या गुंतवणूकदाराने ती रक्कम आतापर्यंत कायम ठेवली असती, तर त्याला आता 25.62 लाख रुपये मिळाले अ कंपनीने डिव्हिडेंडदेखील दिला आहे- Hi-Tech च्या शेअर्सवर विश्वास दाखवणाऱ्यांचा आनंद तेव्हा द्विगुनीत झाला, जेव्हा कंपनीने डिव्हिडेंडची घोषणा केली. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडेंड म्हणून ट्रेड करत होती. कंपनीने प्रति शेअर 0.50 रुपयांचा डिव्हिडेंड गुंतवणूकदारांना दिला होता. कंपनीची चर्चा का होत आहे- हाय-टेक पाईप्सने उत्तर प्रदेशात स्टील मॅन्युफैक्चरिंग प्लांट लावण्यासाठी युपी सरकारसोबत एक करार केला आहे. कंपनी या प्लांटवर 510 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. स्टील पाइप तयार करणाऱ्या कंपनीने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारसोबत 'इन्वेस्ट यूपी' कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार (एमओयू)वर स्वाक्षरी करण्यात आली. कंपनीने म्हटले की, व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आणि उत्तर प्रदेश सरकारचे विशेष प्रोत्साहन पॅकेज स्टील ट्यूब आणि पाईप्स क्षेत्रात आमचे स्थान आणखी मजबूत करण्यास मदत करेल. अजय कुमार बन्सल(व्यवस्थापकीय संचालक, हाय-टेक पाईप्स) म्हणाले की, कंपनी राज्यात तीन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. राज्य सरकारसोबतचा हा करार, अधिक रोजगार निर्मितीसाठी आमची बांधिलकी दर्शवतो. टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketStock MarketIPO