Shark Tank India: सातत्यानं मिळत होतं रिजेक्शन; तरीही वयाच्या ३५ व्या वर्षी अमन गुप्ता यांनी उभी केली कोट्यवधींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:00 AM2022-12-26T10:00:15+5:302022-12-26T10:10:31+5:30

अमन गुप्ता बोट या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीएमओ आहेत. वयाच्या ४० व्या वर्षी ते एक आलिशान आयुष्य जगतायत.

शार्क टँक इंडियाचा पहिला सीजन मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा शार्क टँकचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये चर्चेचा विषय ठरलेले जज अशनीर ग्रोव्हर मात्र दिसणार नाहीयेत.

अमन गुप्ता, नमिता थापर, विनीता सिंह आणि पियुष गोयल या सीझनमध्ये शार्क म्हणून दिसतील. शार्क टँकच्या नव्या सीझनची अनेकजण वाट पाहत आहेत. दरम्यान, या सीझनमध्ये जज म्हणून असलेल्या अमन गुप्ता यांची मोटिवेशनल स्टोरी, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया.

अमन गुप्ता हे बोट या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीएमओ आहेत. वयाच्या ४० व्या वर्षी ते एक आलिशान आयुष्य जगत आहेत. दरम्यान, इतक्या कमी वयात त्यांनी इतकं यश कसं मिळवलं आणि त्यांचा इथवरचा प्रवास थक्क करणारा आहे. वडिलांच्या सांगण्यावरून आपण सीएचं शिक्षण पूर्ण केलं, परंतु त्यात मजा नव्हती. यानंतर नोकरीही केली, त्यातही आनंद मिळत नव्हता असं त्यांनी सांगितलं.

“काहीतरी गडबड आहे असं मला सातत्यानं वाटत होतं. यानंतर मी आणि वडिलांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे अनुभव होता आणि माझ्याकडे पॅशन. माझा कौटुंबिक व्यवसाय नव्हता. परंतु आम्ही सुरूवात केली. पहिल्या सेल्सदरम्यान मला कस्टमरवर संताप आला. सातत्यानं मला वेळ देऊन ते भेट टाळत होते. तेव्हा मला वडिलांकडून इगो न ठेवण्याचा सल्ला मिळाला. मी चार पाच वर्ष तो बिझनेस केला. आम्ही एका कंपनीसाठी काम करत होतो. परंतु त्यानंतर मी भारतात येऊन आपलं ऑफिस सुरु केलं,” असं त्यांनी सांगितलं.

यानंतर व्यवसाय सोडून अमन गुप्ता यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक कंपनीत काम सुरू केलं. परंतु त्या ठिकाणीही त्यांचं मन रमलं नाही. “आता मला पुन्हा व्यवसायाकडे वळावसं वाटलं. त्यावेळी भारत बदलत होता. तुनम्ही काय कराल, काय करू शकता असं लोक म्हणायचे. पण मी केलं. सुरूवातील मला खुपदा रिजेक्ट. करण्यात आलं. सीएमध्येही रिजेक्शन मिळालं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही रिजेक्ट केलं. लोनसाठीही बँकांनी रिजेक्ट केलं,” असंही अमन गुप्ता म्हणाले.

“रिजेक्शन माझ्या आयुष्याचाच एक भाग राहिला आहे. माझ्याकडे पैसेही नव्हते, जॉबही नव्हता,” असंही त्यांनी सांगितलं. तरी यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतसा. अमन गुप्ता यांनी बोट चं काम एका पबमध्ये बसून सुरू केलं. यानंतर ३५ व्या वर्षी त्यांनी मोठी कंपनीच उभारली. जे मनात असे ते केलं पाहिजे. कारण त्यानंतर मनात ती गोष्ट राहायला नको, असं अमन गुप्ता सांगतात.