Shark Tank 2 Ashneer Grover : “तुमचा गेम तुम्हीच खेळा..,” अशनीर ग्रोव्हरनं शार्क टँक २ च्या सर्व जजना केलं अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:14 AM2023-01-09T10:14:53+5:302023-01-09T10:23:40+5:30

'शार्क टँक इंडिया' या बिझनेस रिअॅलिटी शोचा दुसऱ्या सीझनला आता सुरूवात झाली आहे. परंतु पहिल्या सीझनमध्ये भाव खाऊन गेलेले अशनीर ग्रोव्हर मात्र या सीझनमध्ये शार्क म्हणून सहभागी झालेले नाही.

सीझन 2 मध्ये त्यांची जागा अमित जैन यांनी घेतली आहे. त्या शोमधील अनुपस्थितीबाबत अशनीर ग्रोव्हर यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसंच आपण सीझन 2 मध्ये नाही हे समजल्यानंतर आपण पहिलं काम काय केलं याबद्दलही त्यांनी माहिती दिली. आपण हा शो पाहत नाही किंवा त्याबद्दल कोणतीही अपडेट्स ठेवत नाही असंही त्यांनी एका पॉडकास्टदरम्यान स्पष्ट केलं.

'शार्क टँक इंडिया'चा पहिला सीझन चांगलाच हिट ठरला होता आणि हे लक्षात घेऊन त्याचा दुसरा सीझन सुरू करण्यात आला आहे. शार्क टँक इंडिया 1 मध्ये अशनीर ग्रोव्हर यांच्याकडे कठोर वक्तव्य करणारा शार्क म्हणून पाहिलं जात होतं.

यावेळी शोमध्ये काय चालले आहे याची मला कल्पना देखील नाही. सोशल मीडियावरूनही आपण सर्व शार्क अर्थात शोच्या जजना अनफॉलो केले असल्याची माहिती अशनीर ग्रोव्हर यांनी दिली. तसंच यामागचे कारणही त्यांनी सांगितलं आहे.

सेपरेशन क्लिन असावं असं मला वाटतं. मी शार्क टँक सीझन 2 मध्ये नव्हतो, तर मी जितकेही शार्क होते त्यांना आपल्या सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे. आता तो तुमचा गेम आहे. शार्क टँकच्या शूटिंगदरम्यान पडद्यामागे काय सुरू आहे हे मी का पाहत राहू? आता तो माझ्या आयुष्याचा भाग नाही, तर मी भूतकाळात का राहू, असं अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितलं.

शार्क टँक इंडिया सीझन 2 मध्ये एकूण सहा शार्क्स आहेत. अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, पीयूष बन्सल, अमित जैन, विनिता सिंह हे या शोमघ्ये शार्क म्हणू दिसणार आहे. तर कॉमेडिअन राहुल दुआ हा शो होस्ट करत आहे.