Shipping Corporation of India Share : सरकार ‘ही’ कंपनी विकणार, डी-मर्जरच्या मंजुरीनंतर शेअरनं पकडला रॉकेट स्पीड By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:01 PM 2023-02-23T17:01:38+5:30 2023-02-23T17:06:30+5:30
Shipping Corporation of India Share : गुंतवणूकदार मालामाल, पाहा कोणती आहे ही कंपनी. Shipping Corporation of India Share : सरकारी मालकीच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) चे शेअर्स BSE वर गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 9.34 टक्क्यांनी वाढून 125.80 रुपयांवर पोहोचले. एका अहवालानंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.
खरेतर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सुधारित डिमर्जर योजनेला मंजुरी दिली आहे. सुधारित योजनेअंतर्गत, 1,000 कोटी रुपये नॉन-कोअर असेट्समध्ये हस्तांतरित केले जातील. दरम्यान, ही कंपनी निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढे नेण्यात मदत करेल. त्याची निर्गुंतवणूक 2024 या आर्थिक वर्षापर्यंत पूर्ण होईल.
BSE वरील एक्सचेंज फाइलिंगनुसार, SCI बोर्डाने 3 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीच्या ओळखल्या गेलेल्या नॉन-कोर मालमत्तेचे डिमर्जर योजनेला मंजुरी दिली होती.
बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या (MOPSW) निर्देशांनंतर, SCI ने नोव्हेंबर 2021 मध्ये 'नॉन-कोअर' असेट्सच्या निर्गुंतवणूकीसाठी 100 टक्के सब्सिडायरी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड अॅसेट्स लिमिटेड (SCILAL) समाविष्ट केले.
सरकारने आधीच सांगितले होते की SCI मधील प्रस्तावित धोरणात्मक निर्गुंतवणुकीत कंपनीच्या प्रमुख मालमत्तेची निर्गुंतवणूक आणि कंपनीचे व्यवस्थापन नियंत्रण खरेदीदाराकडे असेल. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने जारी केलेल्या विद्यमान आदेशानुसार, SCI ची नॉन-कोर मालमत्ता विलिनीकरण प्रक्रियेद्वारे विकली जाईल.
कंपनीचा शेअर सध्या 125.80 रुपयांवर आहे. या वर्षी YTD स्टॉक जवळपास 15 टक्क्यांच्या खाली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 10 टक्के वर चढला आहे. एका महिन्यात स्टॉक 9.72 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, गेल्या सहा महिन्यांत, त्यात सुमारे 9 टक्क्यांची वाढ झाली आहे.