पालकांनी आपल्या मुलांचं PPF खातं सुरू करावं का? जाणून घ्या याचे अनेक फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 09:43 AM 2023-07-01T09:43:55+5:30 2023-07-01T09:58:48+5:30
तुमच्या मुलांसाठी PPF उघडणं हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे, पण तुमच्या त्यांना त्याचा फायदा मिळण्यासाठी त्यात नियमितपणे गुंतवणूक करत राहणं महत्त्वाचं आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक (PPF) सुरू करतात. परंतु काही वर्षांनी ते बंद करतात. तुमच्या मुलांसाठी पीपीएफ सुरू करणं हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे, पण तुमच्या मुलाला फायदा मिळण्यासाठी तुम्ही त्यात नियमितपणे गुंतवणूक करत राहणं आवश्यक आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना २०१९ च्या परिच्छेद २ नुसार, कोणतेही पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवयीन मुलाच्या नावानं पीपीएफ खातं उघडू शकतात. कोणतीही व्यक्ती त्यांच्या नावावर पीपीएफमध्ये एकापेक्षा जास्त खाते उघडू शकत नाही.
पीपीएफ योजना २०१९ अंतर्गत, आई किंवा वडील अथवा आई-वडील दोघेही अल्पवयीन मुलाच्या पीपीएफ खात्यात योगदान देऊ शकतात. यावर कोणतंही बंधन नाही. याचे काही पुढीलप्रमाणे फायदे आहेत.
लॉक इन पीरिअड - PPF खात्याचा एक फायदा म्हणजे १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी. मूल १८ वर्षांचे झालं की, खातं बंद करायचं की पुढे सुरू ठेवायचं हे ते ठरवू शकतात.
पीपीएफ हा गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. त्याला १५ वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. त्यामुळे त्यात लिक्विडीटीची समस्या राहते. जितक्या लवकर तुम्ही त्यात गुंतवणूक कराल तितका फायदा तुम्ही घेऊ शकाल.
टॅक्सवर फायदा - एका कुटुंबात अनेक पीपीएफ खाती असू शकतात. प्रत्येक सदस्याचं एक पीपीएफ खातं असू शकतं. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एकच पीपीएफ खाते असू शकते. यामध्ये एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते.
पीपीएफवर अधिक व्याज - जेव्हा मुलं मोठी होतील, तेव्हा पीपीएफवर ७ टक्के व्याजदर राहणार नाहीत. कदाचित हे व्याजदर कमीही होऊ शकतात. कारण एक अशी वेळ होती जेव्हा यावर १२ टक्क्यांचं व्याज दिलं जात होतं.
त्यामुळे, तुमचे मूल मोठे होईपर्यंत, त्याच्याकडे मोठा निधी असेल. यामध्ये व्याजाचे पैसे कम्पाऊंडिंग इंटरेस्टसह मिळतील. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिलं जातं.