१५ वर्षांत मिळतील ₹२,०१,८३,०४०, रॉकेट स्पीडनं वाढेल पैसा; ४० व्या वर्षी व्हाल कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 09:34 AM2023-08-09T09:34:52+5:302023-08-09T09:43:48+5:30

टीव्ही किंवा सोशल मीडियावर ती जाहिरात पाहिली असेल.. म्युच्युअल फंड सही है? म्युच्युअल फंडात जोखीम असली तरी पैसा यात तुलनेनं अधिक वाढतो.

टीव्ही किंवा सोशल मीडियावर ती जाहिरात पाहिली असेल.. म्युच्युअल फंड सही है? जर तुम्ही ती पाहिली असेल तर तुम्ही अद्याप गुंतवणूक का केली नाही? यामध्ये असलेल्या रिस्कची भीती वाटते? पण, रिस्क है तो इश्क है हा डायलॉगही तुम्ही ऐकला असेल. म्युच्युअल फंडांचे परतावे हेच दाखवतात की इतर कोणत्याही गुंतवणूकीच्या साधनापेक्षा याठिकाणी कोट्यधीश बनणं सोपं आहे.

जर तुम्हाला कोट्यधीश बनायचं असेल तर तुम्हाला तुमचं ध्येय दीर्घकालीन ठेवलं पाहिजे. हा एक असा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही दीर्घ मुदतीत २ कोटी रुपये सहज कमवू शकता. अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ मुदतीत १२ ते १५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

तुम्हाला जोखीम घेण्याची भीती वाटत असेल, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. यातूनही मोठा निधी मिळू शकतो. समजा तुम्ही १५ वर्षांचा कालावधी घ्याल, तर तुम्हाला २ कोटी रुपये मिळू शकतात.

१५ वर्षात २ कोटी कमवणे हे ऐकायला अवघड वाटतं. पण, हे तितकंही कठीण काम नाही. हा निधी कसा तयार केला जाईल आणि किती महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल हे तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटरद्वारे समजून घेऊ शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीनं १५ वर्षांत २ कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल ते समजून घेऊ. २ कोटींचे टार्गेट घेऊ आणि १५ वर्षात टार्गेट पूर्ण करायचं असेल तर दर महिन्याला ४० हजार रुपये गुंतवावे लागतील. यावर अंदाजे १२ टक्के परतावा गृहित धरल्यास तुम्हाला त्या कालावधीत २,०१,८३,०४० रुपये मिळतील. या दरम्यान तुमची गुंतवणूक ७२ लाख रुपये असेल.

तुम्ही १५ वर्षांसाठी एसआयपीद्वारे दरमहा ४०,००० रुपये गुंतवल्यास तुम्हाला १५ वर्षांमध्ये तुमच्या पैशात सुमारे १.२९ कोटी रुपयांची वाढ झाल्याचं दिसेल. या संपूर्ण कालावधीत गुंतवणूक ७२ लाख रुपये असेल. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की हा अंदाजे परतावा आहे. बाजारातील चढउतार म्युच्युअल फंडाच्या परताव्याच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे. कारण, याच्या मदतीनं तुम्हाला दीर्घ मुदतीपर्यंत रिटर्नचा लाभ मिळतो. समजा वयाच्या २५ व्या वर्षी तुम्ही ४० हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली, तर वयाच्या ४० व्या वर्षी तुमच्याकडे २ कोटी रुपये असतील.

एसआयपी कॅल्क्युलेटरवरून तुम्ही अंदाज लावू शकता की गुंतवणुकीच्या या पद्धतशीर मार्गानं तुम्हाला थेट बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. त्याच वेळी, परतावा देखील ट्रेडिशनल प्रोडक्टपेक्षा जास्त असेल. मात्र, यामध्येही धोका आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपलं उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणूक ठरवावी.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)