SIP Investment : महिन्याला ५ हजारांच्या गुंतवणूकीवर ५ वर्षात ५.८ लाखांचा फंड, पाहा टॉप ५ Mid Cap Funds चा रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:55 PM2023-02-15T20:55:43+5:302023-02-15T21:00:57+5:30

SIP Calculator Top 5 Mid Cap funds: पाहा कोणता म्युच्युअल फंड करतोय चांगली कामगिरी. आतापर्यंत किती दिलेत रिटर्न.

SIP Calculator Top 5 Mid Cap funds: म्युच्युअल फंड कंपन्यांच्या विविध श्रेणींमध्ये अनेक प्लॅन्स आहेत. यामध्ये इक्विटी, डेट, हायब्रीड स्कीम्सचा समावेश आहे. या स्कीम्सच्या विविध श्रेणींचा जोखीम-परतावा देखील भिन्न आहे. यापैकी एक श्रेणी मिड कॅप म्युच्युअल फंड योजना आहे.

इक्विटी म्युच्युअल फंड या श्रेणीतील अनेक स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. AMFI डेटानुसार, जानेवारी 2023 मध्ये, मिड कॅप फंडांमध्ये 1,935.07 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. डिसेंबरमध्ये 1,962 कोटींची गुंतवणूक आली.

जर आपण मिड कॅप फंडातील टॉप 5 स्कीम्स पाहिल्या तर त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएशन झाले आहे. यापैकी काही स्कीम्समध्ये गेल्या 5 वर्षात दुपटीहून अधिक रक्कम वाढली आहे. त्याच वेळी, एसआयपीच्या माध्यमातून मोठा फंड तयार करण्यात आला आहे.

Quant Mid Cap Fund - क्वांट मिड कॅप फंडाने गेल्या 5 वर्षांत 19.93 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाखाची गुंतवणूक गेल्या 5 वर्षांत 2.48 लाख रुपये झाली. तर, 5000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य आज 5.87 लाख रुपये आहे. या स्कीममध्ये 5,000 रुपयांसह गुंतवणूक केली जाऊ शकतात. त्याच वेळी, तुम्ही या स्कीममध्ये किमान 1,000 रुपयांपासूनही SIP गुंतवणूक सुरू करू शकता.

PGIM India Midcap Opportunities Fund - PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्‍युनिटीज फंडाने गेल्या 5 वर्षात 18.55 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या 5 वर्षांत वाढून 2.34 लाख रुपये झाली आहे. तर, 5000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य आज 5.67 लाख रुपये आहे. या स्कीममध्ये 5,000 रुपयांसह गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याच वेळी, तुम्ही या स्कीममध्ये किमान 1,000 रुपयांच्या मदतीनंही SIP गुंतवणूक सुरू करू शकता.

Axis Midcap Fund - ॲक्सिस मिडकॅप फंडाने गेल्या 5 वर्षांत 16.24 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या 5 वर्षांत 2.12 लाख रुपये झाली. तर, 5000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य आज 4.48 लाख रुपये आहे. या स्कीममध्ये 500 रुपयांसह गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत किमान 100 रुपयांसह गुंतवणूक सुरू करू शकता.

Motilal Oswal Midcap Fund - मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने गेल्या 5 वर्षांत 16.22 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचे मूल्य गेल्या 5 वर्षांत 2.12 लाख रुपये झाले. तर, 5000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य आज 5.30 लाख रुपये आहे. या स्कीमणध्ये तुम्ही 500 रुपयांसह गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, तुम्ही या स्कीममध्ये किमान 500 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकता.

Mahindra Manulife Mid Cap Unnati Yojana - महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप उन्नती योजनेने गेल्या 5 वर्षांत 14.23% वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या 5 वर्षांत 1.94 लाख रुपये झाली. तर, 5000 मासिक SIP चे मूल्य आज 4.80 लाख रुपये आहे. या योजनेत 1,000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत किमान 500 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकता.

(नोट - फंड्सच्या परफॉर्नन्सची डिटेल व्हॅल्यू रिसर्चमधून घेण्यात आली आहे. हे रिटर्न १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे आहेत. या लेखात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)