SIP for Retirement : आयुष्यभर नोकरी करायची नाही? निवृत्तीसाठी SIP चा 'हा' फॉर्म्युला वापरा; दरमहा मिळेल अडीच लाख पेन्शन By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:05 PM 2024-11-08T13:05:48+5:30 2024-11-08T13:08:34+5:30
SIP for Retirement : सेवानिवृत्तीच्या नियोजनात कंपाउंडिंगच्या मदतीने मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. कंपाऊंडिंगची खरी जादू दीर्घकाळ गुंतवणुकीत पाहायला मिळते. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करुन तुम्ही हे साध्य करू शकता. सेवानिवृत्तीच्या नियोजनात कंपाउंडिंगच्या मदतीने मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. कंपाऊंडिंगची खरी जादू दीर्घकाळ गुंतवणुकीत पाहायला मिळते.
सेवानिवृत्तीचे नियोजन लवकर सुरू केल्याने तुम्हाला चक्रवाढीचा पूर्ण फायदा होतो. वयाच्या २५ व्या वर्षी एसआयपी सुरू करून एक मोठा निधी त्वरीत तयार केला जाऊ शकतो.
ट्रिपल ५ पैकी पहिले ५ म्हणजे ५ वर्षे आधी सेवानिवृत्ती. लवकर नियोजन करून, तुम्ही वयाच्या ५५ व्या वर्षी ५ कोटी रुपये जमा करू शकता.
तुमची SIP दरवर्षी ५% ने वाढवा. यामुळे गुंतवणुकीची रक्कम हळूहळू वाढत जाईल आणि चक्रवाढीच्या जादूमुळे प्रचंड भांडवल तयार होईल.
उदाहरणार्थ, जर 1000 रुपयाची SIP दरवर्षी ५% ने वाढवली आणि सरासरी ११% परतावा मिळत असेल, तर ३० वर्षांनंतर तुमचा एकूण निधी ५.२० कोटी रुपये होऊ शकतो.
निवृत्तीनंतर, तुम्हाला ५.२० कोटी रुपयांवर ६% FD व्याजावर वार्षिक ३१.२० लाख रुपये मिळू शकतात. ज्यामुळे दरमहा सुमारे २.६० लाख रुपये पेन्शन मिळेल.