SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 08:41 AM2024-11-27T08:41:25+5:302024-11-27T08:52:22+5:30

SIP Vs PPF Vs ELSS: आजच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदाराला आपण कोट्यधीश व्हावं अशी इच्छा असते. पण प्रश्न असा आहे की, एसआयपी, पीपीएफ आणि ईएलएसएसमध्ये कोणती स्कीम तुम्हाला कोट्यधीश होण्यास मदत करेल?

SIP Vs PPF Vs ELSS: आजच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदाराला आपण कोट्यधीश व्हावं अशी इच्छा असते. पण प्रश्न असा आहे की, एसआयपी, पीपीएफ आणि ईएलएसएसमध्ये कोणती स्कीम तुम्हाला कोट्यधीश होण्यास मदत करेल? आपण आज गुंतवणुकीच्या तीन पर्यायांची तुलना करू आणि वार्षिक दीड लाख रुपये गुंतवून आपल्याला किती परतावा मिळेल याचे गणित समजून घेऊ.

PPF (१५ वर्ष) - समजा तुम्ही पीपीएफमध्ये वर्षाला १.५ लाख रुपये गुंतवले, तर तुमची १५ वर्षांची गुंतवणूक २२.५ लाख रुपये असेल. सध्या यावर सरकार ७.१ टक्के व्याज देत आहे. यानुसार तुम्हाला जवळपास ४०.७ लाख रुपयांचा रिटर्न मिळेल. या स्कीममध्ये तुम्ही २५ वर्षांमध्ये कोट्यधीश बनू शकता.

SIP (Systematic Investment Plan, १५ वर्षे) - समजा तुम्ही या स्कीममध्ये वर्षाला १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्ही १५ वर्षांमध्ये एकूण २२.५ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. तज्ज्ञांच्या मते यामध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. यानुसार १५ वर्षांमध्ये तुम्हाला ५९.३५ लाख रुपयांचा रिटर्न मिळेल. याद्वारे तुम्ही २० वर्षांमध्ये कोट्यधीश बनू शकता.

ELSS (Equity Linked Savings Scheme, १५ वर्षे) - समजा तुम्ही या स्कीममध्ये वर्षाला १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्ही १५ वर्षांमध्ये एकूण २२.५ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. तज्ज्ञांच्या मते यामध्ये सरासरी १४ टक्के परतावा मिळतो. यानुसार १५ वर्षांमध्ये तुम्हाला ६६.९२ लाख रुपयांचा रिटर्न मिळेल. याद्वारे तुम्ही जवळपास १८ वर्षांमध्ये कोट्यधीश बनू शकता.

PPF (३० वर्ष) - समजा तुम्ही या स्कीममध्ये वर्षाला १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्ही ३० वर्षांमध्ये एकूण ४५ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये सध्या ७.१ टक्के परतावा मिळत आहे. यानुसार ३० वर्षांमध्ये तुम्हाला १.५४ कोटी रुपयांचा रिटर्न मिळेल.

SIP (Systematic Investment Plan, ३० वर्ष) - समजा तुम्ही या स्कीममध्ये वर्षाला १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्ही ३० वर्षांमध्ये एकूण ४५ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. तज्ज्ञांच्या मते यामध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. यानुसार ३० वर्षांमध्ये तुम्हाला ५.२७ कोटी रुपयांचा रिटर्न मिळेल.

ELSS (Equity Linked Savings Scheme, ३० वर्षे) - समजा तुम्ही या स्कीममध्ये वर्षाला १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्ही ३० वर्षांमध्ये एकूण ४५ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये सरासरी १४ टक्के परतावा मिळतो. यानुसार ३० वर्षांमध्ये तुम्हाला ८.११ कोटी रुपयांचा रिटर्न मिळेल.

पीपीएफ हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. परंतु त्यात तुम्हाला मिळणारा रिटर्न मर्यादित आहे. तर अधिक रिटर्नसाठी एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. तर दुसरीकडे ELSS हा टॅक्स सेव्हिंग सोबतच पैशांची जलद वाढ करणारा एक पर्याय आहे.

तुमच्या गुंतवणुकीची निवड ही तुमचं ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता यावर अवलंबून असते. ईएलएसएस आणि एसआयपी चांगला परतावा देतात, परंतु त्यामध्ये अधीक जोखीम असते. पीपीएफ हा कमी परतावा देणारा सुरक्षित पर्याय आहे. जर तुमचे ध्येय कोट्यधीश बनण्याचे असेल तर ईएलएसएस आणि एसआयपी तुमचं ध्येय लवकर पूर्ण करतील. पीपीएफ हा दीर्घ काळासाठी सुरक्षित पर्याय आहे, पण कोट्यधीश होण्यासाठी अधित वेळ लागतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)