Small Business Idea : सरकारच्या मदतीने हा बंपर कमाईचा व्यवसाय सुरू करा, दरमहा लाखो रुपयांचा होईल नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:29 PM2021-12-12T18:29:39+5:302021-12-12T18:44:08+5:30

Small Business Idea: तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता.

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता केंद्र सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही फायदेशीर व्यवसाय करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता.

सध्या पेपर कपची मागणी खूप आहे. तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत मदतही करत आहे. चला तर मग जाणून घेऊया, या व्यवसायाबद्दल...

केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेतूनही या व्यवसायासाठी मदत मिळते. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सरकार व्याजावर सबसिडी देते. या योजनेंतर्गत, तुम्हाला एकूण प्रकल्प खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतःहून गुंतवावी लागते. मुद्रा योजनेअंतर्गत सरकार 75 टक्के कर्ज देऊ शकते.

या व्यवसायासाठी तुम्हाला एका मशीनची आवश्यकता असेल, जी विशेषतः दिल्ली, हैदराबाद, आग्रा आणि अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. अशी मशीन्स तयार करण्यासाठी इंजिनीअरिंग वर्क करणाऱ्या कंपन्या तयार करतात.

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेची आवश्यकता असेल. मशीनरी, इक्विपमेंट फिस इक्विपमेंट व फर्नीचर, डाय, इलेक्ट्रि​फिकेशन, इंस्टालेशन आणि प्री-ऑपरेटिव्हसाठी 10.70 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकते. जर तुम्ही कुशल आणि अकुशल दोन्ही कामगार इथे ठेवले तर तुम्हाला यासाठी दरमहा सुमारे 35000 रुपये खर्च करावे लागतील.

या व्यवसायाच्या खर्चावर नजर टाकल्यास 3.75 लाख रुपयांपर्यंत त्याच्या साहित्यावर खर्च येईल. त्याच वेळी, त्याच्या यूटिलिटीजवर 6000 रुपयांपर्यंत खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, इतर खर्च जवळपास 20,500 रुपयांपर्यंत लागू शकतो.

जर तुम्ही एका वर्षात 300 दिवस काम केले तर इतक्या दिवसात तुम्ही 2.20 कोटी पेपर कप तयार करू शकता. दरम्यान, तुम्‍ही बाजारात 30 पैसे प्रति कप किंवा ग्लास या दराने विकू शकता. अशा प्रकारे हा व्यवसाय तुम्हाला बंपर नफा देईल.