SIP Investment : छोटी गुंतवणूक मोठा रिटर्न: ५,१०,१५,२० वर्षांत बनेल मोठा पैसा; ₹१००० मधून होणार ₹१५,१५,९५५ ची कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:53 AM 2024-08-06T08:53:24+5:30 2024-08-06T09:13:00+5:30
SIP Investment : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. भविष्यात मोठी रक्कम तयार करायची असेल तर गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला मोठी रक्कम उभी करायची असे तर गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे. SIP Calculator: आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. भविष्यात मोठी रक्कम तयार करायची असेल तर गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला मोठी रक्कम उभी करायची असे तर गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे. सध्या अनेक जण शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे म्हणजेच एसआयपीकडे वळू लागलेत.
बाजारात गुंतवणूक करताना सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं ते म्हणजे म्युच्युअल फंड. परंतु, म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये तुलनेनं मिळणारा परतावा हा अधिक असतो म्हणून लोक एसआयपीची निवड यामध्ये गुंतवणुकीची सुरुवात फक्त ५०० रुपयांपासून करता येते. फायदे इतके आहेत की ते आपल्याला विचार करण्याऐवजी गुंतवणूक करण्यास भाग पाडतात.
यामध्ये तुम्ही छोटीशीही गुंतवणूक करू शकता, त्यात टॉप अपचीही सुविधा मिळते, इतकंच कायतर तुम्ही ती पॉझही करू शकता आणि ती पुन्हा सुरूही करू शकता. अशा परिस्थितीत तुम्हीही आता एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर किमान १००० रुपयांपासून सुरुवात करा. तसंच ५, १०, १५, २० वर्षात तुमचा पैसा किती वेगाने वाढतो हे समजून घेऊ.
बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे की एसआयपीवर सरासरी १२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. अनेकवेळा हा परतावा १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. कंपाउंडिंगचा फायदा झाला तर दीर्घ मुदतीत दमदार नफा मिळतो. ही केवळ गुंतवणूक नाही तर मोठी संपत्ती तयार करायचं उत्तम साधन आहे.
तुम्ही यामध्ये जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितका तुम्हाला त्याचा फायदा अधिक होईल. म्हणजे तुम्ही एसआयपीमध्ये जितकी जास्त काळ गुंतवणूक सुरू ठेवाल तितका अधिक परतावा मिळवण्याची संधी मिळेल. चला तर मग जाणून घेऊया १००० रुपयांचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुम्हाला ५, १०, १५ आणि २० वर्षात किती परतावा देऊ शकतो.
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, १००० रुपयांच्या एसआयपीमुळे ५ वर्षांत एकूण ६० हजार रुपयांची गुंतवणूक होईल. समजा १२ टक्के परतावा मिळाला तर एकूण कमावलेली रक्कम २२,४८६ रुपये होते. परंतु, ५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर तुमची एकूण रक्कम ८२,४८६ रुपये होते. जर रिटर्न १५ टक्के असेल तर २९ हजार ६८२ रुपयांच्या व्याजासह एकूण ८९ हजार ६८२ रुपये मिळतील.
१० वर्षांसाठी एसआयपी केल्यानंतर एकूण गुंतवणूक १,२०,००० रुपये होईल. अंदाजित परतावा १२ टक्के असेल. व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न १,१२,३३९ रुपये असेल. १० वर्षांनंतर एकूण तुमची एकूण कमाई २,३२,३३९ रुपये होईल. जर तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळाले तर तुमची रिटर्न द्वारे कमाई १,५८.६५७ रुपये होईल आणि १० वर्षात एकूण रक्कम २,७८,६५७ रुपये होईल.
१००० रुपयांची एसआयपी १५ वर्षांसाठी केल्यास एकूण गुंतवणूक १,८०,००० रुपये होईल. अंदाजित परतावा १२ टक्के असेल. व्याजातून मिळणारं एकूण उत्पन्न ३ लाख २४ हजार ५७६ रुपये असेल. तर १५ वर्षांनंतर तुमची एकूण कमाई ५,०४,५७६ रुपये होईल. जर तुम्हाला १५ टक्के व्याज मिळालं तर, तुम्हाला व्याजाच्या माध्यमातून ४,९६, ८६३ रुपये मिळतील आणि १५ वर्षांनंतर मिळणारी एकूण रक्कम ६,७६,८६३ रुपये असेल.
एसआयपीमध्ये २० वर्षांसाठी केवळ १००० रुपयांची गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक २,४०,००० रुपये होईल. अपेक्षित परतावा १२ टक्के असेल. व्याजातून मिळणारं एकूण उत्पन्न ७ लाख ५९ हजार १४८ रुपये होईल. २० वर्षांनंतर एकूण कमाई ९,९९,१४८ रुपये होईल. तर ही २० वर्षांमध्ये तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळाल्यास व्याजाद्वारे तुम्हाला १२,७५,९५५ रुपये मिळतील. २० वर्षांत मिळणारी एकूण कमाई १५,१५,९५५ रुपये असेल.
(टीप : यामध्ये एसआयपीबाबत सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)