‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 02:11 PM 2023-02-21T14:11:58+5:30 2023-02-21T14:21:43+5:30
कोरोनाच्या महासाथीनंतर चीनमधील परिस्थितीमुळे संपूर्ण जगात सेमीकंडक्टरचे संकट निर्माण झाले. कोरोनाच्या महासाथीनंतर चीनमधील परिस्थितीमुळे संपूर्ण जगात सेमीकंडक्टरचे संकट निर्माण झाले. तेव्हापासून सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यासाठी चीनचा पर्याय शोधला जात होता. आता भारत ही पोकळी भरून काढणार आहे.
देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट लवकरच गुजरातमध्ये सुरू होणार आहे, म्हणजेच तो दिवस दूर नाही जेव्हा जगभरातील स्मार्टफोन, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण मेक इन इंडिया सेमीकंडक्टर्स (चिप) द्वारे समर्थित असतील.
उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन ही सेमीकंडक्टर क्षेत्रातील मोठी उत्पादक कंपनी गुजरातच्या धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनमध्ये संयुक्तपणे हा प्रकल्प उभारणार आहेत. हा विशेष जागा अहमदाबादजवळ येतो.
गुजरात सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतीच माहिती दिली की, वेदांता आणि फॉक्सकॉन यांनी यासाठी संयुक्त उपक्रम तयार केला आहे. या संयुक्त उपक्रमाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. कंपनी राज्यात १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारणार आहे.
देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कॉर्पोरेट गुंतवणूक आहे. या प्लांटमध्ये केवळ सेमीकंडक्टरच नाही तर डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिटही स्थापन करण्यात येणार आहे. त्याच वेळी, हे देशातील पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट असेल.
वेदांता आणि फॉक्सकॉन भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प स्थापन करण्यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा करत आहेत, पण त्यांचा उत्पादन प्रकल्प नेमका कुठे उभारला जाईल, हे दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. याबाबत आता परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
राज्य सरकारी कर्मचार्यांसह जागेचे विश्लेषण केल्यानंतर, संयुक्त उपक्रमाने प्रकल्प उभारण्यासाठी धोलेरा योग्य असल्याचे आढळले आहे. हा प्रकल्प अजूनही ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
गुजरात सरकार आणि संयुक्त उपक्रम यांच्यात सामंजस्य करार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाला होता. गांधीनगर येथे रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले होते की, या प्रकल्पातून राज्यात एक लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. हे संयंत्र उभारण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी आपले सरकार सर्वतोपरी मदत करेल असेही त्यांनी सांगितले होते.