रस्त्याच्या कडेला उभे राहून आपणही पिता बाटलीबंद पाणी, या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना! वाचून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:17 PM2023-01-11T15:17:45+5:302023-01-11T15:23:56+5:30

आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा हमखास पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली विकत घेतो. ही बाटली प्लॅस्टिकची असते. आपण ही बाटली कुठूनही खरेदी करतो.

आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा हमखास पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली विकत घेतो. ही बाटली प्लॅस्टिकची असते. आपण ही बाटली कुठूनही खरेदी करतो. पण, ही बाटली तुमच्या तब्येतीसाठी धोक्याची असू शकते. यापेक्षा तुम्ही एक छोटी धातूची बाटली सोबत ठेवा आणि ती रिसायकल करताही येते. या संदर्भात एका ट्रॅव्हल ब्लॉगरने महत्वाची माहिती दिली आहे.

तो ब्लॉगर गेल्या तीन वर्षापासून बाहेरून बाटलीबंद पाणी विकत घेत नाही, तो नेहमी मेटलची बाटली जवळ ठेलतो. प्लॅस्टिकच्या बाटल्यांशिवाय लोक प्रवास करू शकतात आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहू शकतात अशा अनेक टिप्सही त्यांनी दिल्या आहेत.

एका अहवालानुसार, पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे पॉलिमर आहे. पॉलिमर म्हणजे कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि क्लोराईडपासून बनलेले.

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार बहुतेक पाण्याच्या बाटल्यांमध्ये पॉली कार्बोनेट प्लास्टिकचा वापर केला जातो. पाण्याच्या बाटल्या थोड्या लवचिक असतात आणि त्यात Phthalates आणि Bisaphenol-A नावाचे रसायन वापरले जाते. हे हृदयाशी संबंधित आजार किंवा मधुमेहाचे कारण बनू शकतात, त्यामुळे या बाटल्यामधील पाणी पिणे शरीराला धोक्याचे होऊ शकते.

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिल्याने आपल्या नकळत मायक्रोप्लास्टिक्स शरीरात विरघळतात. एका अहवालानुसार, रस्त्यावर आढळणारे बंद बाटलीबंद पाणी गरम वस्तूंच्या संपर्कात आल्यानंतर खूप नुकसान करते. उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने आरोग्याला खूप नुकसान होते.

या बाटल्यांमुळे मायक्रोप्लास्टिक पाण्यात सोडू लागतात. हे पाणी प्यायल्यावर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणारी अंतःस्रावी प्रणाली बिघडते. असे सतत करत राहिल्यास वंध्यत्व, लवकर यौवन, हार्मोनल असंतुलन आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. मायक्रो प्लास्टिकमुळे लोकांना कॅन्सरची समस्या भेडसावत आहे.

फोल्ड करण्यायोग्य बाटली सोबत ठेवा जी सहज कुठेही नेली जाऊ शकते. ती बाटली सहज आपल्याला घेऊन जाता येते. यामुळे तुम्हाला बाटलीचे ओझे वाटणार नाही. तुम्हाला अशा बाटल्या ऑनलाइन आणि स्थानिक दुकानात मिळतील.

तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाणार आहात, तेव्हा पाणी संपेल तिथे ती बाटली भरुन घेता येते.

तुम्ही रेल्वे-बस-मेट्रो स्टेशन, स्थानिक दुकान, हॉटेल किंवा सरकारी-खासगी कार्यालय इत्यादी ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर करू शकता.