केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 08:41 AM2024-11-25T08:41:58+5:302024-11-25T08:50:09+5:30

Investment SIP : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी सर्व पालक बचत करून आपल्या कमाईचा काही भाग गुंतवत असतात. जर तुम्ही योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यातून मोठी रक्कम उभी करता येऊ शकते.

Investment SIP : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी सर्व पालक बचत करून आपल्या कमाईचा काही भाग गुंतवत असतात. जर तुम्हालाही आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न आणि स्वप्नातील घर खरेदी करायचं असेल आणि गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधत असाल तर म्युच्युअल फंड एसआयपी हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर दीर्घ काळासाठी एसआयपीमधून भरपूर पैसा कमावता येतो. ५००० रुपयांपासून एसआयपी कशी सुरू करता येईल, तसंच या माध्यमातून २५ वर्षांनंतर कोट्यवधी रुपयांचा निधी कसा जमा करता येईल याची माहिती आज आपण घेणार आहोत.

एसआयपी जितकी जास्त काळ चालवली जाते, तितका जास्त नफा होतो. खरं तर एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा फायदा दीर्घकाळात जास्त नफा देतो. २५ वर्षात कोट्यवधी रुपयांचा फंड गोळा करण्यासाठी तुम्ही फक्त ५००० रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता.

पण अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या एसआयपीमध्ये दरवर्षी स्टेप अप करावं लागेल. स्टेप-अप म्हणजे आपल्याला दरवर्षी आपल्या एसआयपीची रक्कम वाढवावी लागेल.

५००० रुपयांपासून एसआयपी सुरू केल्यानंतर जर तुम्ही दरवर्षी १० टक्के स्टेप-अप केली तर २५ वर्षात तुम्ही कोट्यवधी रुपये कमवू शकता. समजा जर तुम्हाला अंदाजे १२ टक्के परतावा मिळाला तर २५ वर्षांत तुमच्याकडे २.१३ कोटी रुपयांचा फंड असेल. यात आपल्या गुंतवणुकीचा अंदाजे ५९ लाख रुपये आणि १.५४ कोटी रुपयांच्या अंदाजे रिटर्नचा समावेश आहे.

या कालावधीत तुम्हाला दरवर्षी सरासरी १५ टक्के परतावा मिळाला तर २५ वर्षांत तुम्ही ३.२९ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम हे लक्षात घ्यावं लागेल की, एसआयपीतील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. यासोबतच आपल्याला मिळणाऱ्या परताव्यावरही कर भरावा लागेल, हेही लक्षात ठेवावं लागेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)