₹२००० ची SIP सुरू करून जमवाल ₹२ कोटी, कोट्यधीश बनवणारा हा फॉर्म्युला मोठे-मोठे लोकही सांगू शकणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:54 IST2025-01-17T08:41:45+5:302025-01-17T08:54:39+5:30
SIP Investment : साधारणपणे मोठी गुंतवणूक करूनच आपण मोठा फंड जोडू शकतो, असं लोकांना वाटतं. पण तसं काहीच नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या बचतीतूनही स्वत:ला करोडपती बनवू शकता.

SIP Investment : साधारणपणे मोठी गुंतवणूक करूनच आपण मोठा फंड जोडू शकतो, असं लोकांना वाटतं. पण तसं काहीच नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या बचतीतूनही स्वत:ला करोडपती बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त योग्य आर्थिक रणनीती असलेल्या अशा ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल, जिथून तुम्हाला महागाईवर मात करणारा परतावा मिळू शकेल.
याशिवाय दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवावे लागतील आणि ही गुंतवणूक नियमित ठेवावी लागेल. हा फॉर्म्युला आहे ज्याद्वारे तुम्ही जर २००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही स्वत:ला २ कोटींचा मालक बनवू शकता.
कमी पगारातून करोडपती बनवण्याचा फॉर्म्युला २५/२/५/३५ चा आहे. यामध्ये तुम्हाला एसआयपी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणुकीच्या धोरणासह गुंतवणूक करावी लागेल. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल. २ म्हणजे २ हजार रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करा. ५ म्हणजे दरवर्षी ५% रक्कम वाढवा आणि ३५ म्हणजे ही एसआयपी ३५ वर्षे सतत चालू ठेवा.
२५ वर्षात तुम्ही २ हजार रुपयांपासून एसआयपी सुरू करता. आता दरवर्षी ५ टक्के रक्कम वाढवावी लागणार आहे. उदाहरणानं समजून घ्या - तुम्ही २ हजार रुपयांपासून एसआयपी सुरू केली आणि वर्षभर दरमहा २ हजार रुपयांची गुंतवणूक केली. पुढच्या वर्षी तुम्हाला २ रुपयांच्या ५% म्हणजेच फक्त १०० रुपयांची वाढ करावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या वर्षी २,१०० ची एसआयपी चालवावी लागेल.
पुढच्या वर्षी म्हणजे तिसऱ्या वर्षी पुन्हा २१०० म्हणजे १०५ रुपयांच्या ५ टक्के वाढ करून २२०५ रुपयांची एसआयपी वर्षभर चालवावी. त्याचप्रमाणे दरवर्षी तुम्हाला सध्याच्या रकमेच्या ५ टक्के वाढ करावी लागते. ही गुंतवणूक ३५ वर्षे सुरू ठेवावी लागते.
फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही ३५ वर्षे गुंतवणूक करत राहिलात तर ३५ वर्षांत तुम्ही एकूण २१,६७,६८८ रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. यामध्ये १२ टक्के परताव्यानुसार गुंतवणुकीवर फक्त १,७७,७१,५३२ रुपयांचे व्याज मिळेल.
अशा प्रकारे गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम यांची एकत्र केल्यास तुम्हाला एकूण १,९९,३९,२२० रुपये (सुमारे २ कोटी) मिळतील. ३५ वर्षांनंतर तुम्ही ६० वर्षांचे असाल. याशिवाय तुम्ही या वयात तब्बल २ कोटी रुपयांचेही मालक असाल.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)