फक्त 5 लाखांत सुरू होणारा 'हा' बिझनेस तुम्हाला करेल मालामाल! महिन्याला कमवाल 70,000 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 10:23 AM2021-02-07T10:23:53+5:302021-02-07T10:37:36+5:30

नवी दिल्ली : देशात असे अनेक व्यवसाय आहेत, जे तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता आणि त्यातून भरपूर नफा कमवू शकता. अशाच एक व्यवसाय म्हणजे डेअरी उत्पादनाचा (Dairy Products) व्यवसाय आहे.

डेअरी उत्पादन म्हणजचे दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की ज्यांचा दररोज वापर केला जातो. यामुळे जास्त नुकसान नाही तर या व्यवसायात जास्त नफा आहे.

डेअरी उत्पादनाच्या व्यवसायात तुम्ही फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतच दरमहा 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता.

विशेष म्हणजे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे जर तुम्हीही डेअरी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असला तर संपूर्ण प्लॅन करून सुरु करू शकता...

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल गरजेचे असते. यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, मोदी सरकारच्या पंतप्रधान मुद्रा लोन योजनेमुळे तुम्ही सहज व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. या व्यवसायासाठी सरकार आपल्याला पैशांसोबत या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती देते जेणेकरुन तुम्ही आरामात व्यवसाय सुरू करू शकता.

ज्यावेळी तुम्ही डेअरी उत्पादनांचा व्यवसाय सुरू करता त्यावेळी सरकारच्या मुद्रा कर्जामधून एकूण खर्चाच्या 70 टक्के रक्कम मिळेल.

प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार, या व्यवसायाचा प्रोजेक्ट जवळपास 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तयार केला जाऊ शकतो. मात्र, यामध्ये व्यक्तीला फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

जर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्टनुसार, या व्यवसायात एका वर्षात 75 हजार लिटर फ्लेवर्ड मिल्कची विक्री होऊ शकते. याशिवाय, 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर लोणी आणि 4500 किलो तूपही विकले जाऊ शकते. याचा जर हिशोब केला तर सुमारे 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओव्हर होईल. ज्यामध्ये सुमारे 74 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये 14 टक्के व्याज कपात करूनही तब्बल 8 लाखांची बचत होऊ शकते.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. ज्यामध्ये 500 चौरस फूट जागा काम करण्यासाठी, रेफ्रिजरेशन 150 चौरस फूट, वॉशिंग 150 चौरस फूट, ऑफिस, शौचालय आणि इतर सुविधांसाठी 100 चौरस फूट जागा आवश्यक आहे.

Read in English