१०० रूपयांत घ्या Post Office च्या 'या' विशेष स्कीमचा लाभ; पाहा काय मिळतोय फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 06:54 PM2021-06-26T18:54:27+5:302021-06-26T19:08:57+5:30

Post Office Spacial Scheme : लोकं आजही सुरक्षित स्कीम्ससाठी पोस्ट ऑफिसच्या निरनिराळ्या स्कीम्सचा विचार करताना दिसतात.

Investment In Post Office Scheme : जेव्हा केव्हा गुंतवणूकीचा प्रश्न येतो तेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सना पसंती देत असतात. मोठ्या प्रमाणात लोक आपला पैसा त्या स्कीम्समध्ये गुंतवताना दिसतात.

दरम्यान, पोस्ट ऑफिसची आरडी आजही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित असतो. पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम काय आहे ते पाहू.

पोस्ट ऑफिसमधील आरडी ही एक सरकारी स्कीम आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे.

पोस्ट खात्याच्या आरडी स्कीममध्ये गुंतवणूकदारांना ५.८ टक्के व्याज देण्यात येतं. ज्याचं तिमाहीत कंमाऊंडींग होतं. परंतु जर वेळेत पैसे भरले नाहीत, तर त्यावर दंडही आकारला जातो.

कोणताही भारतीय नागरिक केवळ १०० रूपये भरून पोस्ट खात्याची आरडी सुरू करू शकतो. केवळ याचे हप्ते भरताना तारखेची काळजी घेणं आवश्यक आहे.

जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत खातं उघडलं असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता पहिल्या १५ दिवसांतच जमा करावा लागेल.

दुसरीकडे तुम्ही अखेरच्या १५ दिवसांत अकाऊंट सुरू केलं असेल तर तुम्हाला हप्ता पुढील १५ दिवसांत जमा करावा लागेल.

जर तुम्ही एखाद्या महिन्यात हप्ता जमा करू शकला नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. प्रत्येक १०० रूपयांवर तुमच्याकडून १ रूपया दंड आकारला जाईल.

जर तुम्ही वेळेत पैसे भरत नसाल, तर तुमचा अकाऊंट बंदही केला जाऊ शकतो. या आरडीची विशेष बाब म्हणजे तुम्हाला याव कर्जही घेता येऊ शकेल.

ही आरडी तुम्ही प्रीमॅच्युअर असतानाही बंद करू शकता. परंतु अशा स्थितीत तुन्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारं व्याजच देण्यात येईल.