10 जूनपासून नवा नियम लागू; 'या' बँकेतील ग्राहकांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 10:18 AM2020-06-09T10:18:00+5:302020-06-09T10:32:33+5:30

भारतीय स्टेट बँकेंचे (SBI) तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 10 जूनपासून एसबीआयकडून नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. याचा फायदा देशातील कोट्यावधी ग्राहकांना होणार आहे.

भारतीय स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (एमसीएलआर) 0.25 टक्क्याची कपात केली आहे. नवे व्याजदर येत्या 10 जूनपासून लागू होतील.

गृह, वाहन कर्ज कमी दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच एमसीएलआरशी संलग्न कर्जाचे हप्ते आणि ईबीआर किंवा रेपोसंलग्न कर्जाच्या मासिक हप्त्यांत (EMI) बचत होणार

बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क लिंक लेंडिंग रेट (ईबीआर) आणि रेपो रेट लेंडिंग रेटमध्ये (आरआरएलआर) 0.40 टक्क्याची कपात केल्याने ईबीआर 6.65 टक्के झाला आहे. तर रेपो रेट लेंडिंग रेट 6.25 टक्के झाला आहे.

30 वर्षांच्या मुदतीचे 25 लाखांचे गृहकर्ज असल्यास एमसीएलआर कर्जदरावर आधारित असल्यास कर्जदाराची दरमहा 421 रुपयांची बचत होणार आहे. या अगोदर मे महिन्यात देखील बँकेने एमसीएलआर दरात 0.15 टक्क्याची कपात केली हो

ईबीआर, आरएलएलआरशी संलग्न असणारे होम लोनचे हप्ते सुमारे 660 रुपयांनी स्वस्त होतील.

यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांनी रेपोसंलग्न कर्जदर आणि एमसीएलआर दर कमी केले आहेत.