State Bank कडून ग्राहकांना दिलासा; Home Loan च्या व्याजदरात पुन्हा कपात By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:11 PM 2021-05-03T12:11:56+5:30 2021-05-03T12:17:08+5:30
State Bank Home Loan Interest Rates : यापूर्वी बँकेनं वाढवले होते व्याजदर; पुन्हा एकदा कपात करत ग्राहकांना दिला दिलासा. पाहा किती वाचतील महिन्याला पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देताना गृहकर्जाचे व्याज दर कमी केले आहेत.
बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं ३० लाख रूपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याज दरात कपात करत ते ६.९० टक्क्यांवरून ६.७० टक्के केले आहेत.
तर ३० लाख ते ७५ लाख रूपयांच्या गृहकर्जावरील व्याजदर ६.९० टक्के राहतील.
तर ७५ लाखांच्यावरील गृहकर्जावर ७.०५ टक्के व्याज आकारलं जाईल.
याशिवाय बँकेनं महिलांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. महिलांना व्याजदरात ०.०५ टक्क्यांचा अतिरिक्त लाभ दिला जाईल.
स्टेट बँक कॅल्क्युलेटरनुसार १५ वर्षांसाठी घेण्यात आलेल्या ३० लाखांच्या गृहकर्जासाठी ६.९५ टक्के व्याजदर आकारला जात होता.
त्यानुसार ग्राहकाला २६,८८१ रूपयांचा ईएमआय भरावा लागत होता. परंतु आता व्याजदरात करण्यात आलेल्या कपातीनंतर ग्राहकांना मोठा फायदा मिळेल.
जर आता ग्राहकांना १५ वर्षांसाठी ३० लाख रूपयांचं गृहकर्ज घेतलं तर त्याचा ईएमआय २५,६४६ रूपये इतका येईल.
नव्या घोषणेनंतर स्टेट बँकेचे व्याजदर ६.९० टक्क्यांवर ६.७० टक्के इतके झाले आहेत.
स्टेट बँक कॅल्क्युलेटरनुसार जर कोणत्याही व्यक्तीनं १५ वर्षांसाठी ३० लाखांचं कर्ज घेतलं असेल तर महिन्याला त्यांचं ४१७ रूपये वाचतील.
यानुसार ग्राहकांची १५ वर्षांसाठी जवळपास ७५,०६० रूपयांची बचतही होणार आहे.
तर महिलांसाठीही स्टेट बँकेनं विशेष योजना आणली आहे. यानुसार महिलांना गृहकर्जाच्या व्याज दरावर ०.०५ टक्क्यांची सूट देण्यात येते.
महिला ग्राहकांना १५ वर्षांकरीता ३० लाखांसाठी २६,३८१ रूपयांचा ईएमआय द्यावा लागेल. यानुसार महिला ग्राहकांना १५ वर्षांसाठी ९० हजार रूपयांची बचत करता येऊ शकते.