सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI स्वस्तात देणार खरेदी करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:06 AM2023-03-05T09:06:19+5:302023-03-05T09:12:51+5:30

गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीवर पाठ फिरवली आहे.

गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीवर पाठ फिरवली आहे. आता या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय एक ऑफर घेऊन आली आहे, या ऑफरमध्ये ग्राहकांना स्वस्तात सोनं खरेदी करता येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक खास ऑफर मिळत आहे. तुम्ही ६ मार्चपासून स्वस्तात सोने खरेदी करू शकता. एसबीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

'Sovereign Gold Bond सह तुमच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा आणि सुरक्षितता मिळवा', असं ट्विट बँकेने केले आहे. यासोबत SBI ने Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक का करावी याची ६ कारणे दिली आहेत.

यामध्ये तुम्हाला खात्रीशीर परताव्याची सुविधा मिळेल. Sovereign Gold Bond गुंतवणूकदारांना दरवर्षी २.५% दराने व्याज मिळणार आहे, हे व्याज सहामाही आधारावर दिले जाईल. तसेच भांडवली नफा करातून दिलासा मिळेल.

सोन्याचा हा प्रकार सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही अडचण नाही. यासोबतच कोणताही जीएसटी आणि मेकिंग चार्ज भरावा लागणार नाही. SGB थेट तुमच्या डिमॅट खात्यात येईल. कर्ज सुविधेसाठीही वापरता येईल.

या योजनेंतर्गत ६ ते १० मार्चपर्यंत स्वस्त सोने उपलब्ध होणार आहे. यासाठी इश्यूची किंमत ५,६११ रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे.

स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नियुक्त पोस्ट ऑफिस, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड वगळता सर्व बँकांद्वारे Sovereign Gold Bond रोखे जारी केले जातात.

Sovereign Gold Bond ची परिपक्वता ८ वर्षे आहे. पण पाच वर्षांनंतर, पुढील व्याज भरण्याच्या तारखेला, तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता.

Sovereign Gold Bond मध्ये, गुंतवणूकदाराने किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास, गुंतवणूकदार Sovereign Gold Bond वरही कर्ज घेऊ शकतो, पण सुवर्ण रोखे तारण ठेवावे लागतील.