₹6 च्या शेअरची कमाल, 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याजवळ आहे का हा करोडपती बनवणारा स्टॉक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:05 IST2025-01-25T14:59:29+5:302025-01-25T15:05:29+5:30
गेल्या ५ वर्षात या शेअरच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली आहे...

शेअर बाजारात उच्च परतावा मिळविण्यासाठी, गुंतवणूकदारांना योग्य स्टॉक दीर्घकाळापर्यंत होल्ड करून ठेवावा लागतो. असाच एक स्टॉक म्हणजे अॅग्रो इंडस्ट्रीज. गेल्या ५ वर्षात या शेअरच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली आहे.
एकेकाळी या स्टॉकची किंमत ६ रुपयांपेक्षाही कमी होती. आता तो ७०० रुपयांच्या वर पोहोचला आहे. या कालावधीत, कंपनीच्या शेअर्सच्या किमतींमध्ये १४२ पटीहूनही अधिक वाढ झाली आहे. ज्यामुळे स्थितीगत गुंतवणूकदार करोडपती बनले आहेत.
गेल्या एका महिन्याचा विचार करता, या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत घसरली आहे. नफा बुकिंगमुळे, अॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत १०१२.५५ रुपयांवरून ७८२.५० रुपयांवर आली आहे.
गेल्या ६ महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी केला, ते ५ टक्के नफ्यात आहेत. याच वेळी, एका वर्षात स्टॉकची किंमत २९२.२० रुपयांवरून ७८२ रुपयांपर्यंत वाढली आहे. यामुळे गेल्या एका वर्षात स्थितीगत गुंतवणूकदारांना १७० टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे.
27 मार्च 2020 रोजी कंपनीचा शेअर 5.52 रुपयांवर होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 142 पट तेजी आली आहे.
गुंतवणूकदार मालामाल - जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत त्याचे २.७० लाख रुपये झाले असते.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत तिचे मूल्य १.४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते. अर्थात केवळ ५ वर्षांतच या स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1019.90 रुपये प्रति शेअर आहे. तर निचांक 278 रुपये प्रति शेअर एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)