खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:56 PM 2024-09-30T16:56:21+5:30 2024-09-30T17:09:03+5:30
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत 3600% पेक्षाही अधिक वधारला आहे... देशांतर्गत शेअर बाजारात हाहाकार दिसत आहे, सेंसेक्स 1200 अंकांनी घसरला आहे. मात्र, असे असतानाच दुसरीकडे अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे.
रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचा शेअर सोमवारी 7 टक्क्यांहून अधिक वधारत 345.40 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या साडेचार वर्षांत कंपनीचा शेअर 3600% पेक्षाही अधिकने वधारला आहे. दरम्यान हा शेअरने 9 रुपयांवरून 340 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
महत्वाचे म्हणज हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातली 350.90 रुपये एवढी आहे.
3600% हून अधिकची उसळी - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत 3600% पेक्षाही अधिक वधारला आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 9.20 रुपयांवर होता. 30 सप्टेंबर 2024 रोजी तो 345.40 रुपयांवर पोहोचला.
गेल्या 4 वर्षांचा विचार करता, कंपनीचा शेअर 1400% हून अधिकने वधारला आहे. तर गेल्या 2 वर्षांचा विचार करता रिलायन्स इन्फ्राचा शेअर 150% हून अधिकने वधारला आहे.
4 महिन्यांत पैसा डबल - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने केवळ 4 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. 31 मे 2024 रोजी रिलायन्स इन्फ्राचा शेअर 166.45 रुपयांवर होता. तो 30 सप्टेंबर 2024 रोजी 345.40 रुपयांवर पोहोचला.
गेल्या एका महिन्याचा विचा करता, कंपनीचा शेअर 65 टक्क्यांहून अधिकने वाधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 350.90 रुपये आहे. तर नीचांकी पातली 143.70 रुपये आहे.
निधी उभारण्यासाठी 1 ऑक्टोबरला बोर्डाची बैठक - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाची 1 ऑक्टोबरला बैठक होत आहे, या बैठकीत निधी उभारण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे. कंपनी प्रेफरेन्शिअल इश्यू, क्वॉलीफाइड इंस्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू अथवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्सच्या माध्यमाने निधी उभारू शकते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)