एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 09:22 PM2024-11-09T21:22:03+5:302024-11-09T21:33:35+5:30

महत्वाचे म्हणजे, शुक्रवार कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत, ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली आहे, त्यांतील एक म्हणजे, Avalon Technologies. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 2 दिवसांत 44 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. महत्वाचे म्हणजे, शुक्रवार कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

2 दिवसांपासून लागतेय अप्पर सर्किट - Avalon Technologies च्या शेअरमध्ये गेल्या 2 व्यवहाराच्या दिवसांत अप्पर सर्किट लागले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी अप्पर सर्किट लागले होते. यानंतर सुक्रवारीही या शअरला अप्पर सर्किट लागले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 849.45 रुपयांवर पोहोचला आहे.

...म्हणून कंपनीच्या शेअरमध्ये दिसतेय तेजी - मजबूत तिमाही निकालांमुळे Avalon Technologies च्या शेअरमध्ये ही तेजी आल्याचे मानले जात आहे. कंपनीने गुरुवारी तिमाही निकालाची घोषणा केली होती. कंपनीने जारी केलेल्या रिझल्टनुसार, वार्षिक आधारावर नेट प्रॉफिट 140 टक्के वाढले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचे नेट प्रॉफिट 17.48 कोटी रुपये होते. तर एकवर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनी चा नेट प्रॉफीट 7.28 कोटी रुपये होता.

Avalon Technologies चा रेव्हेन्यू सप्टेंबर तिमाहीत 275.02 कोटी रुपये होता. वर्षिक आधारावर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 36.80 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू 200.99 कोटी रुपये होता.

कंपनीकडे 1490 कोटी रुपयांचे ऑर्डर बुक आहे. यात 1100 कोटी रुपयांचा लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे. जे 14 महिने ते 3 वर्षांपर्यंत पूर्ण करायचे आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)