याला म्हणतात बंपर परतावा...! ₹39 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1 लाखाचे झाले ₹2.82 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:50 IST2025-03-25T18:43:58+5:302025-03-25T18:50:54+5:30

आज आम्ही आपल्या एका अशाच शेअरची माहिती देत आहोत, ज्याने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

शेअर बाजार हा एखाद्या सामान्य व्यक्तीलाही कोट्यधीश बनवू शकतो. मात्र, यासाठी त्या व्यक्तीला केवळ शेअर बाजाराचे ज्ञान आणि धैर्य असावे लागते. आज आम्ही आपल्या एका अशाच शेअरची माहिती देत आहोत, ज्याने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

हा शेअर आहे भारत रसायनचा (Bharat Rasayan) हा शेअर आज 5% ने वधारून 11,125 रुपयांवर पोहोचला.

भारत रसायनच्या या शेअरची किंमत २००९ मध्ये ३९.४० रुपये एवढी होती. आता हा शेअर NSE वर ११,१२५ रुपयांवर व्यवहार करत आहे. अर्थ गेल्या १६ वर्षांत या शेअरमध्ये २९,००० टक्के एवढा तगडा परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कालावधीत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज तिचे २.८२ कोटी रुपये झाले असते.

भारत रसायनच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत १०७.७४ टक्क्यांचा परतावा दिला आहे. अर्थात, या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी एखाद्याने १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे ₹२.०९ लाख रुपये झाले असते.

...तथापि, अल्पावधीत या शेअरमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. गेल्या एका वर्षात भारत रसायनच्या शेअर्समध्ये २८.७५ टक्के वाढ झाली आहे. तर, सहा महिन्यांचा विचार करता, या शेअरमध्ये २.५० टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, बाजारात घसरण दिसत असतानाही, हा शेअर एका महिन्यात सुमारे ८ टक्क्यांनी वधारला आहे. YTD चा विचार करता, हा शेअर ₹१०,१३०.४५ वरून ८.९१ टक्क्यांनी वधारून आताच्या किंमतीपर्यंत आला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)