डिफेन्स कंपनीच्या नफ्यात 83% ची वाढ, शेअर खरेदीसाठी तुटून पडले गुंतवणूकदार! आता ₹138 वर आलाय भाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:44 IST2025-02-05T18:37:55+5:302025-02-05T18:44:42+5:30
शेअर्समध्ये ही वाढ होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे डिसेंबर तिमाहीतील निकाल.

शेअर बाजारातील अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडचा शेअर आज (बुधवार, ५ फेब्रुवारी) ७.४% ने वधारला. यानंतर आता हा शेअर ₹ १३८ वर पोहोचला आहे. याच बरोबर हा शेअर आता ₹१५७ प्रति शेअरच्या आपल्या लाइफ टाइम हायच्या जवळ पोहोचला आहे.
शेअर्समध्ये ही वाढ होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे डिसेंबर तिमाहीतील निकाल. खरे तर, ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडचा नफा वाढला आहे.
कंपनीच्या नफ्यात ८३.५% ने वाढ - डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ८३.१% ने वाढून ₹१८ कोटींवर पोहोचला आहे. जो आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ₹९.९ कोटी एवढा होता.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत PAT मार्जिन १४० बेसिस पॉइंट्सने वाढून १२.३% झाले. तसेच, कंपनीचा महसूल ६२.५% ने वाढून ९१.३ कोटी रुपयांच्या तुलनेत १४८ कोटी रुपये झाला. यामागचे कारण म्हणजे सातत्याने मिळणाऱ्या ऑर्डर.
अशी आहे शेअरची स्थिती - गेल्या दोन वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर ₹१२.४० वर व्यवहार करत होता. तो सध्या १०००% पर्यंत वधारला आहे. जून २०२२ ते नोव्हेंबर या कालावधीत, शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना १,३७०% पर्यंत परतावा मिळाला आहे.
अपोलो मायक्रो सिस्टिम्स, ही हैदराबाद येथील डिफेंस कंपनी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)