याला म्हणतात बंपर परतावा...! ₹7 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, 1 लाखाचे केले ₹2 कटी; आपल्याकडे आहे का हा शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:30 IST2025-03-05T17:26:54+5:302025-03-05T17:30:36+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मालामाल केले.

शेअर बाजारात दीर्घकाळासाठी पैशांची गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. त्यांना दीर्घ कालावधीत जबरदस्त परतावाही मिळाला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मालामाल केले.

या शेअरचे नाव आहे GE Vernova T&D India. हा शेअर आज ३% ने वधारून १,४०० रुपयांवर पोहोचला आहे. २१ वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ ७ रुपये होती. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने ₹१ लाखाचे ₹२ कोटी रुपये केले आहेत.

जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियाच्या शेअरची कामगिरी - जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियाचा शेअर सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (बीएसई) ₹१,४०० वर व्यवहार करत आहे. हा शेअर गेल्या २१ वर्षांत अंदाजे १९,९०० टक्क्यांनी वधारला आहे. या कालावधीत हा शेअर ₹ ७ वरून सध्याच्या किमतीपर्यंत पोहोचला आहे.

या शेअरचा इतिहास पाहता, हा शेअर दीर्घ काळात गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः पैसे छापण्याचे मशिन ठरला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता, या शेअरने या कालावधीत 1000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये ४३.६० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

...मात्र, हा शेअर कमी कालावधीसाठी गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या सहा महिन्यांत जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियाच्या शेअरची किंमत १३.९६ टक्क्यांनी तर एका महिन्यात जवळपास १८.५० टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

YTD चा विचार करता, शेअरची किंमत ३१.६० टक्क्यांनी घसरली आहे. हा शेअर बुधवारी २.३५ टक्क्यांनी वाधारून व्यवहार करत होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)