या कंपनीसोबत सलमानचं नाव जोडलं जाताच रॉकेट बनला शेअर, खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹274 वर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:42 PM2024-08-21T17:42:34+5:302024-08-21T18:02:15+5:30

या वृत्तानंतर शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली असून, लोक मोठ्या प्रमणावर शेअर खरेदी करत आहेत...

जीआरएम ओव्हरसीजचा शेअर आज बुधवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. हा शेअर आज 7 टक्क्यांनी वधारून 274.90 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला आहे.

खरेतर, बासमती तांदळाची नर्यातदार जीआरएम ओव्हरसीजने बॉलीवुड अभिनेता सलमान खानला बासमती तांदूळ आणि गव्हाच्या पिठासाठी ब्रँड अंबेसेडर बनवले आहे. या वृत्तानंतर शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली असून, लोक मोठ्या प्रमणावर शेअर खरेदी करत आहेत.

काय म्हणते कंपनी ? - जीआरएम ओव्हरसीजचे मॅनेजिंग डायरेक्टर अतुल गर्ग यांनी म्हटले आहे की, सलमान खान यांची लोकप्रियता आणि त्याचा मोठा चाहता वर्ग कंपनीच्या बासमती तांदळाच्या 10X (10पट) ब्रँड श्रेणी आणि गव्हाच्या पिठाच्या 10X स्ट्रेंथ श्रेणीशी जुळतो.

खान म्हणाला, ‘‘GRM सोबत भागीदारी करून मी आनंदी आहे. गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावरील ब्रँडचा भर माझ्या तत्त्वांशी सुसंगत आहे.

असा आहे कंपनीचा प्लॅन - कंपनीने म्हटले आहे, सलमान खानसोबतच्या भागीताहीचा उद्देश, त्याच्या लोकप्रीय प्रतिमेद्वारे GRM ब्रँड मजबूत करणे आणि जागतिक पातळीवर ग्राहकांपर्यंत पोहोचणे, असा आहे.

जीआरएम ओव्हरसीजची स्थापना 1974 साली झाली. ही कंपनी 42 हून अधिक देशांत प्रीमियम बासमती तांदळाची निर्यात करते. जीआरएम ओव्हरसीज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही निर्देशांकांवर सूचीबद्ध आहे.

अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती - मार्च 2024 च्या मध्यात हा स्मॉलकॅप स्टॉक जवळपास ₹115 प्रति शेअरवर आला होता. महिन्याभरात हा शेअर 40% पर्यंत वधारला. एफएमसीजी स्टॉकने गेल्या पाच महिन्यांत 126% हून अधिकचा परतावा दिला आहे.

बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 286.15 रुपये तर नीचांक 114.15 रुपये एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1,578 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)