या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:56 PM2024-07-05T20:56:23+5:302024-07-05T21:03:02+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात सांगत आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा दिला आहे.

अनेकांना शेअर बाजारातून कमी कालावधीत आणि कमी गुंतवणुकीत बंपर परतावा मिळावा, अशी इच्छा असते. खरे तर, शेअर बाजारात कमी कालावधीत चांगला परतावा देणारे शेअरही असतात. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात सांगत आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा दिला आहे.

हा शेअर आहे टेलिकॉम टॉवर कंपनी जीटीएल इन्फ्राचा. या शेअरने केवळ 17 दिवसांतच आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट करत, त्यांना मालामाल केले आहे.

हा शेअर 13 जून, 2024 रोजी 5 टक्क्यांच्या घसरणीसह बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 2.05 रुपयांवर बंद झाला होता. यानंतर तो 5-5 टक्क्यांच्या तेजीसह अपर सर्किटवर पोहोचला. आज 5 जुलै, 2024 रोजी हा शेअर 4.15 रुपयांवर बंद झाला आहे. अशा प्रकारे केवळ 17 कामकाजाच्या दिवसांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत.

महत्वाचे म्हणजे, एलआयसी, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आदींनी गुंतवणूक केली आहे. यात फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर्सचाही वाटा आहे.

LIC ची गुंतवणूक - या पेनी स्टॉकमध्ये भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची 3.33 टक्के हिस्सेदारी आहे. केवळ एलआयसीच नाही, तर अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.

बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँकेचीही गुंतवणूक - मार्च तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, जीटीएल इंफ्रामध्ये प्रमोटर्सचा वाटा केवळ 3.28 टक्के एवढा आहे.याशिवाय, युनियन बँक ऑफ इंडियाचा वाटा 12.07 टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वाटा 7.36 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकेचा वाटा 5.23 टक्के, आयसीआयसीआय बँकेचा वाटा 3.81 टक्के, कॅनरा बँक-मुंबईचा वाटा 4.05 टक्के, तर बँक ऑफ बडोदाचा वाटा 5.68 टक्के एवढा आहे. तसेच एफपीआयचा वाटाही 0.12 टक्के एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)