₹1100 वरून आपटून थेट ₹5 वर आला हा शेअर, आता 9 दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, 13 फेब्रुवारी महत्वाची तारीख By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 06:58 PM 2024-02-11T18:58:10+5:30 2024-02-11T19:07:28+5:30
हा शेअर सलग 9 व्या दिवशीही अपर सर्किटवर आहे...! रियल्टी सेक्टरकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. या क्षेत्रातील अनेक शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला याच क्षेत्रातील एका खास स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत. खरे तर हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने मालामाल करत आहे. हा स्टॉक आहे हाऊसिंग डेव्हलपमेन्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा.
हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर सलग 9 व्या दिवशी अपर सर्किटवर आहे. NSE वर हा शेअर 5.80 रुपयांवर पोहोचला आहे. 13 फेब्रुवारीला कंपनीची बोर्ड मीटिंग होणार आहे. या मीटिंगमध्ये डिसेंबर तिमाहीच्या निकालांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.
1000 रुपयांच्याही वर पोहोचला होता भाव - महत्वाचे म्हणजे, हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर हा एकेकाळी बाजारातील गुंतवणूकदारांचा आवडता शेअर मानला जात होता. हा शेअर 2008 मध्ये 1100 रुपयांवर पोहोचला होता. मात्र सध्या, हा शेअर 99% घसरला आहे. खरे तर, ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून मार्गक्रमण करत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सेठ डेव्हलपर्स आणि सनटेक रियल्टी सारख्या दिग्गज नावांसह 25 कंपन्यांनी संकटात असलेली ही कंपनी खरेदी करण्यासाठी रुची दाखवली आहे.
काय आहे प्रकरण? - पीएमसी बँक घोटाळ्यात एचडीआयएलची भूमिका संशयास्पद होती. या प्रकरणात कंपनीचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांना तुरुंगातही जावे लागले. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या काही मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) मुंबई खंडपीठाने बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवरून HDIL विरुद्ध दिवाळखोरीचा खटला सुरू करण्याचे निर्देश दिले होते. याचिकेत संबंधित कंपनीवर 522 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)